साहित्य:

मसाला :

शेंगदाणे १/४ कप जाडसर वाटलेले
तीळ १/४ कप जाडसर वाटलेले
किसलेले खोबरे १/३ कप
कोथिंबीर १/२ कप चिरलेली
हिरवी मिरची ४ ते ५ चिरलेल्या
आलं २ चमचे किसलेलं
पातीचा लसूण बारीक चिरलेला
तिखट २ चमचे
साखर १ चमचा
लिंबाचा रस २ टेबल स्पून
मीठ चवीनुसार
तेल ३-४ टेबल स्पून

भाज्या:

लहान बटाटे ४-५
लहान वांगी ३-४
वालाच्या शेंगा तोडलेल्या १ कप
तुरीचे दाणे १/२ कप
रताळी चिरलेली १/२ कप
सुरण चिरलेला १/२ कप
पाणी २ कप
कोथिंबीर १ चमचा

मेथी मुठीया:

मेथी निवडून चिरलेली २ १/२ कप
कणिक १/२ कप
बेसन १/२ कप
हिरव्या मिरच्या ३ बारीक चिरलेल्या
आलं १ चमचा किसलेले
हळद १/४ टी स्पून
तिखट १ टी स्पून
साखर २ १/२ टी. स्पून
लिंबाचा रस १ टी स्पून
तेल ३ टेबल स्पून
पाणी २-३ टेबल स्पून
तळण्यासाठी तेल
मीठ चवीनुसार

कृती:

मसाला:- शेंगदाणे आणि तीळ मिक्सर मध्ये व्यवस्थित बारीक कुट करून घ्या. एका भांड्यात काढून त्यात किसलेले खोबरे आणि मसाल्याचे इतर पदार्थ टाकून एकत्र करुन घ्या.

भाज्या:- भाज्या चिरून घ्या. बटाटे आणि वांगी कापून त्यात मसाला भरून घ्या. हा उरलेला मसाला पुढच्या रेसिपी साठी ठेऊन द्या.

उंधियो:- कुकर मध्ये तेल गरम करून त्यात तुरीचे दाणे वालाच्या शेंगा. सुरण, रताळी, आणि उरलेला मसाला घालून मीक्स करा. त्यात पाणी मीठ घालून मसाला भरलेले बटाटे आणि वांगीही ठेवा. कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवर २ शिट्या येई पर्यंत शिजवून घ्या.