17 December 2017

News Flash

खाद्यपदार्थांचा ‘हवाई अड्डा’

चक्क विमानात हॉटेल अन् कॅफे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: February 20, 2017 6:10 PM

(छाया सौजन्य : Hawaiaddaldh/Facebook)

‘चल आपण विमानात जाऊन कॉफी पिऊ किंवा दुपारचे जेवण घेऊ’ किंवा ‘एक काम करु आजची पार्टीच आपण विमानात करू’ अशी वाक्य जर भविष्यात तुमच्या कानावर पडली तर आश्चर्य वाटून घेऊ नका. कारण भारतात पहिल्यांदाच विमानात हॉटेल सुरु करण्यात आलं आहे. ‘हवाई अड्डा’ असे या हॉटेलचे नाव असून पंजाबमधल्या लुधीयाना येथे ते आहे.

पंजाबमधल्या लुधीयाना येथील एका व्यवसायिकाने चक्क विमानाचे रुपांतर हॉटेलमध्ये केले आहे. १८० प्रवाशांची मर्यादा असलेल्या एअरबस a320चे रुपांतर त्याने हॉटेलमध्ये केले. दिल्लीवरून हे विमान आणण्यात आले. लुधीयानातल्या फिरोझपुर रोडवर हा हवाई अड्डा आहे. शुद्ध शहाकारी असलेले हे हॉटेल सुरु होताच त्याच्या सोशल मीडियावर खूपच चर्चा रंगल्या. पंजाबमधले अशा प्रकारचे हे पहिलेच हॉटेल आहे. फॅमेली लंच, डिनरचा आस्वाद येथे घेता येणार आहे. पण याच्या काही भागात हँगआऊटसाठी कॅफेही तयार करण्यात आला आहे. हे कमी की काय किटी पार्टीसाठी हॉलही या हवाई अड्ड्यामध्ये आहे.

#BoardingSoon ✈️

A post shared by Hawai Adda (@hawaiaddaldh) on

First Published on February 13, 2017 10:46 am

Web Title: hawai adda first aeroplane restaurant