18 January 2019

News Flash

Health tips : हे आहेत करवंद खाण्याचे फायदे

करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात.

करवंदामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.

आंबा, फणस, काजू, खरबूज, कलिंगड बरोबरच या काळात रानमेवाही मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो. वर्षांतून एकदा मिळणाऱ्या या फळांचं उन्हाळ्यात आवर्जून सेवन करावं. ‘डोंगरची काळी मैना’ म्हणून प्रचलित असलेले करवंद हे फळ आरोग्याच्या दृष्टीने फारच उपयुक्त आहे. करवंद ही नैसर्गिकरीत्या जंगलात वाढलेली असतात त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची रासायनिक प्रक्रिया केली जात नाही. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उकाड्यात ही फळे खूप लाभदायक ठरतात म्हणूनच ती वेगवेगळ्या विकारांवर गुणकारी मानली जातात.

वाचा : समजून घ्या! पौगंडावस्थेतील आहाराच्या गरजा

करवंदामध्ये असणारे औषधी गुणधर्म
– करवंदामध्ये ‘क’ जीवनसत्त्व भरपूर प्रमाणात असल्याने त्वचाविकारामध्ये करवंद सेवनाचा फायदा दिसून येतो.
– करवंद हा रानमेवा आहे, तो नैसर्गिकरित्या उपलब्ध झालेला असल्यामुळे याच्या सेवनाने दुष्परिणाम होत नाहीच. जर रक्ताच्या कमतरतेमुळे अशक्तपणा जाणवत असेल तर रोज मूठभर करवंदे खावीत. याने रक्ताची कमतरता नक्कीच भरून येईल.
– करवंदामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.
– करवंदामध्ये मोठ्या प्रमाणात सायट्रिक अ‍ॅसिड असल्यामुळे उष्णतेमुळे होणारे विकार करवंद सेवनाने कमी होतात.
– उन्हाचा त्रास होत असेल यामुळे, शरीराचा दाह होत असेल, तर करवंदाचे सरबत करून प्यावे.

वाचा : उन्हाळ्यात दुपारच्या जेवणात हे पदार्थ आवर्जून असावेत

– करवंदामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्याने मलावष्टंभाचा त्रास कमी होतो.
– अरुची, मळमळ, उलटी या विकारांमध्ये करवंदे अत्यंत गुणकारी आहेत.
– आम्लपित्तामुळे छातीत जळजळ होत असेल तर करवंदाचे सरबत थोड्याथोड्या अंतराने पीत राहावे, काही वेळाने आराम वाटतो.
– करवंदाची पाने हीदेखील औषधी गुणधर्माने युक्त आहेत. ही पाने मधामध्ये बारीक करून खाल्ल्यास कोरडा खोकला नाहीसा होतो.
– करवंदामध्ये कॅल्शिअमही भरपूर प्रमाणात असते.

First Published on April 14, 2018 10:23 am

Web Title: health benifits of carissa spinarum in marathi