28 October 2020

News Flash

तुम्हाला संधिवात आहे? मग जाणून घ्या ‘या’ उपचाराबद्दल

संधिवात असणाऱ्यांनी घ्या 'ही' काळजी

डॉ. निलेश नोलखा

शारीरिक दुखण्यांमधील सगळ्यात त्रासदायक आजार म्हणजे संधिवात. या आजारपणामध्ये शरीरासोबतच मानसिक आरोग्यावरही परिणाम होत असतो. तसंच या आजारामध्ये चालल्यावर, धावपळ केल्यावर लगेच सांध्यांवर परिणाम होतो. त्यामुळे या आजारपणामध्ये स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? सांधेदुखीवर काही उपाय आहे का? याबाबत जाणून घेऊया…

संधिवात हा एक अनुवंशिक आजार आहे. या आजारात शरीर स्वतःच्याच निरोगी पेशींवर हल्ला चढवतो. परिणामी, सांध्यांवर सूज येऊ लागते. आपल्या शरीरात खांदे, कोपर, मनगटे, हिप्स आणि गुडघे येथे हाडांचे प्रमुख सांधे असतात. या सांध्यांमुळे चालणे, उठणे व बसणे अशक्य होते. परंतु, या आजारात एका सांधा जरी कमकुवत झाला तरी आपल्या शरीराची हालचाल कमी होऊ लागते. याशिवाय संधिवात म्हणजे सूज, लालसरपणा, कडकपणा अशी चिन्हे दिसून येतात. संधिवात आजार २० पेक्षा जास्त प्रकारचे असतात. हा अतिशय जटील आजार असून हा फक्त वृद्धांनाच नव्हे तर, कोणत्याही वयात हा आजार होऊ शकतो. संधिवात असल्यास हाडांची झीज आणि असह्य वेदना होतात. या वेदना दूर करण्यासाठी आवश्यक औषध आणि स्टेरॉईटचा वापर केला जातो. याशिवाय शरीराला पुरेसे व्हिटामिन मिळावेत यासाठी औषधही दिली जातात.

संधिवाताचे अनेक प्रकार आहेत. जसे की, (उदा. संधिवात (आरए), सोरियाटिक गाठी, संधिरोग, ल्युपस इ. हे स्वयंप्रतिकार रोग आहेत. ज्यात स्वतःची रोगप्रतिकारक शक्ती शरीरातील निरोगी पेशी, अवयव किंवा सांधे यांच्यावर हल्ला करते. काही कारणांमुळे सांधे किंवा इतर अवयवांमध्ये तीव्र जळजळ होते. यामुळे सांधे किंवा इतर अवयवांचे नुकसान होऊ शकते. यापैकी बहुतेक रोगांचे कोणतेही स्पष्ट कारण आढळले नाही.

संधिवात असणाऱ्यांनी नेमकं काय करावेत –

१. व्यायाम-
फिजिओथेरपी किंवा व्यायामाच्या काही प्रकारांमुळे आपल्याला आपले सांधे मजबूत करण्यास मदत मिळते. सांधेदुखीची समस्या दूर करण्यासाठी नियमित चालणे, सायकल चालविणे, एरोबिक्स आणि पोहण्याचा व्यायाम अतिशय फायदेशीर ठरू शकतो. तज्ज्ञाच्या मार्गदर्शनाखाली कार्डिओ आणि योग्य प्रशिक्षण देखील करू शकता. योग्य व्यायामासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.

२. इतर उपाय-
वेदना कमी करण्यासाठी विविध वेदना-मुक्त जेल किंवा उष्णता किंवा कोल्ड पॅड्सचा वापर करा.

३. आहार-
संधिवात रूग्णाच्या आहाराबद्दल अनेक गैरसमज आहेत. त्यामुळे संधिवात तज्ञांकडून योग्य तो सल्ला घ्या. कारण, टोमॅटो, दही, लिंबू, संत्री, चिंच यांसारखे आंबट आणि चणा डाळ, कोबी, तांदूळ, मांसाहार इत्यादी पदार्थ संधिवात असलेल्यांनी खाऊ नयेत असे म्हटले जाते. मात्र, यात कोणतेही तथ्य नाही. याउलट संत्री, पेरू इत्यादी पदार्थ व्हिटॅमिन सी देतात जे सर्वसाधारण आरोग्यासाठी खूप चांगले असतात. चणा डाळ, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ इत्यामुळे संधिवात रूग्णांमध्ये स्नायूंचे सामर्थ्य वाढविण्यासाठी आवश्यक प्रथिने उपलब्ध होऊ शकतात. महत्त्वाचे म्हणजे, घरातील ताजे अन्न खावेत हे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर आहे. जंकफूड, तळलेले, प्रक्रिया केलेले किंवा रेस्टॉरंटमधील पदार्थांचे सेवन करणे टाळावे.

व्हिटॅमिन डी चा समावेश असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करावा. व्यायाम आणि निरोगी अन्नामुळे जळजळ कमी होण्यास मदत होते, वजन कमी होऊ शकते आणि संधिवात किंवा दाहक रोग असलेल्या रूग्णांमध्ये इतर बरेच फायदे होऊ शकतात.

संधिवातासाठी कोणत्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा?

सांधेदुखीचा त्रास जाणवत असेल तर तातडीनं संधिवात तज्ज्ञ डॉक्टराचा सल्ला घ्यावा. डॉक्टर दुखणं किती आहे हे पाहून उपचार सुरू करतील. याशिवाय सांधे किंवा इतर अवयवांच्या वेदना, सूज आणि जळजळ कमी करण्यासाठी औषधे देतील.

शस्त्रक्रिया-
संधिवातात हाडांची झीज झाल्यास यावर शस्त्रक्रिया हा एक पर्याय आहे. यासाठी हिप, गुडघा प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करावी लागते. असह्य वेदना, शारीरिक हालचाली करता येत नसलेल्या रूग्णांसाठी शस्त्रक्रिया खूप उपयुक्त ठरू शकते.

(लेखक डॉ. निलेश नोलखा हे मीरा रोड येथील वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये संधिवात तज्ज्ञ आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 5:47 pm

Web Title: health osteoarthritis reasons and remedies ssj 93
Next Stories
1 अनेक दशकांनी पुन्हा मोपेडनं मोटरबाइक्सना टाकलं मागे
2 नवरात्रीचे उपवास करताय? हे लक्षात ठेवाच
3 Big Billion Days Sale 2020 : 4K क्यूएलईडी आणि युएचडी TV वर ५० टक्केंची सूट
Just Now!
X