देशभरात आज होळीला उत्साहात सुरुवात झाली आहे. आजच्या दिवशी अनेक ठिकाणी होलीका दहन म्हणजे होळी पेटवण्यात येते. जसा हा सण आनंदाचा आहे तसाच तो साजरा करण्यामागे काही विशिष्ट हेतू देखील आहे. साधारणतः फाल्गुन म्हणजेच मार्च महिन्यात येणारा हा सण मृग नक्षत्रापूर्वी संपूर्ण वातावरण शुद्ध करून पर्जन्याच्या दृष्टीने पोषक वातावरणाची निर्मिती करीत असल्याने होळी पेटवण्याला विशेष महत्त्व आहे.

शिशीर ऋतुतल्या पानगळीमध्ये शेतात जमलेला पालापोचाळा होळीच्या निमित्ताने शेतकरी जाळून टाकायचा. यामुळे शेतजमीनी अधिक सुपीक व्हायच्या. पारंपारिक होळीत झाडांच्या सुक्या काट्या, गोवऱ्या इत्यादी जाळलं जातात. गोवऱ्या जाळल्यानं हवा शुद्ध होते. त्याचप्रमाणे होळीच्या निमित्ताने कडूनिंब-एरण्ड यांसारखी औषधी झाडांचं लाकूडही जाळलं जायचं. हे जाळण्यामागेही शास्त्रीय कारण आहे. थंडीनंतर सुरु होणार्‍या उन्हाळ्याच्या ऋतुसंधिकाळामध्ये रोगजंतूचा प्रसार होण्याचा धोका अधिक असतो त्यामुळे रोगजंतूचा नाश करण्यासाठी तसेच या काळात त्रासदायक कीटकांचा नाश करण्यासाठी होळी पेटवली जाते.

mumbai businessman cheated for rupees 22 lakhs, lure of secret gold
गुप्तधनातील सोन्याचे आमिष दाखवून व्यावसायिकाची फसवणूक करणाऱ्याला अटक
importance of rest for airline pilots
विश्लेषण : वैमानिकांची विश्रांती का महत्त्वाची?
Mumbai road mastic, Mumbai potholes road,
मुंबई : खड्ड्यांना ‘मास्टिक’ची मलमपट्टी, प्रयोगांना सोडचिठ्ठी देत नव्या प्रशासनाचे जुन्या पद्धतीलाच प्राधान्य
cashew farmer marathi news, konkan farmer marathi news
काजू वायदे : कोकणातील उत्पादकांना वरदान

या होळीच्या भोवती फेर धरुन नाचणे हादेखील एकत्रितपणे समूहाला व्यायाम घडवण्याचा व आनंद साजरा करण्याचा;  पर्यावरणाला अनुरूप असा उत्सवाचा विधी होता. परंतु आता मात्र पारंपारिक होळीच स्वरूपच पूर्णपणे बदललं आहे. आता होळीसाठी सर्रास झाडांची कत्तल केली जाते, तसेच होळी पेटवताना त्यात प्लॅस्टिक, टायरदेखील जाळले जाते त्यामुळे हवा शुद्ध होण्याऐवजी ती अधिक दूषित होतं जाते.