वाहन चालवण्यासाठी आधी शिकाऊ  (लर्निंग) आणि कायमस्वरूपी (परमनंट ) असे दोन परवाने लागतात. शिकाऊ  परवाना मिळवण्यासाठीची ऑनलाइन प्रक्रिया १४ जूनपासून सुरू झाली आहे. यासाठी एक ऑनलाइन परीक्षाही घेतली जाणार आहे. यात ६० टक्के गुण मिळवावे लागणार आहेत. यानंतर आपल्याला शिकाऊ परवाना मिळणार आहे. त्यानंतर सहा महिन्यांच्या आता आपल्याला कायमच्या परवान्यासाठीची प्रक्रिया करावी लागणार आहे.  यामुळे घरबसल्या ऑनलाइन सेवेचा वापर करून सर्वांना वाहन परवाना (लायसन्स) काढता येणार आहे.

सोळा वर्षे पूर्ण झाली की वेध लागतात ते लायसन्स किंवा वाहन चालवण्याचा परवाना काढण्याचे. त्यासाठी मग कागदपत्रांची जुळवाजुळव, प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या फेऱ्या आणि त्रास आलाच. पण ते बंधनकारक असल्याने सर्व त्रास सहन करीत आपण वर्ष ते सहा महिन्यांची प्रक्रिया करून कसेबसे लायसन्स मिळवत असतो. मात्र आता या सर्व त्रासातून सुटका होणार आहे. शासनाने ‘आरटीओ’शी संबंधित १८ सेवा आता ऑनलाइन केल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सारथी ४.० या अद्ययावत प्रणालीअंतर्गत आधार क्रमांकाशी संलग्न असलेल्या ऑनलाइन शिकाऊ  वाहनचालक परवाना तसेच वाहन नोंदणीच्या ऑनलाइन प्रणालीचे लोकार्पण नुकतेच केले असून यातील शिकाऊ परवाना ऑनलाइन सेवा आता संकेतस्थळावर सुरू केली आहे.

maintaining weight will be a challenge for next four months says vinesh phogat
आता वजन राखण्याचे आव्हान – विनेश फोगट
पाणीपुरवठ्याच्या तक्रारींची ‘संततधार’, पुणेकरांकडून चार दिवसांत ४०० तक्रारी
Stop on black market of water action will be taken against those who demand money for tankers
पाण्याच्या काळ्या बाजाराला बांध, टँकरसाठी पैसे मागणाऱ्यांवर कारवाई होणार
will Andheri Subway under water this year too work of widening of Mogra drain will be done next year
‘अंधेरी सबवे’ यंदाही पाण्याखाली? मोगरा नाल्याच्या रुंदीकरणाचे काम पुढच्या वर्षीच

शिकाऊ वाहन परवाना कसा मिळवाल?

शिकाऊ लायसन्स मिळवण्यासाठी आता या  parivahan.gov.in    संकेतस्थळाला भेट द्या. उजव्या कोपऱ्यात Driving licence Service असा पर्याय दिसेल. तिथे क्लिक केल्यावर राज्य निवडा. महाराष्ट्र असे निवडल्यावर पुढच्या पानावर अनेक पर्याय दिसतील. आपल्याला हवा तो पर्याय निवडून पुढची प्रक्रिया करा. पहिलाच पर्याय शिकाऊ परवानाचा आहे. यात तुमच्याकडे आधारकार्ड असेल तर पहिला पर्याय निवडा व आधारकार्ड नसेल तर दुसरा पर्याय. मात्र दुसरा पर्याय निवडल्यास तुम्हाला कागदपत्रे पडताळणीसाठी ‘आरटीओ’ कार्यालयात जावे लागणार आहे. त्यामुळे ही प्रक्रिया करण्यापूर्वी तुमच्याकडे आधारकार्ड लिंक गरजेचे आहे.

पहिला पर्याय निवडल्यानंतर आपला आधारकर्ड नंबर टाकावा. तो टाकल्यानंतर एक  ‘ओटीपी’ आपल्या मोबाइलवर येईल. तो टाकल्यानंतर आपली सर्व माहिती अर्जात भरली जाईल. यात आपल्याला काहीही बदल करता येणार नाही. खाली एक महत्त्वाची माहिती भरायची आहे, ती लक्षात ठेवा. या ठिकाणी आपल्याला दुचाकी, चारचाकी की दोन्हींचे एकत्रित परवाना काढायचे आहे हे  निवडावे लागणार आहे.

त्यानंतर खाली पिवळ्या रंगाच्या पर्यायावर गेल्यानंतर अर्ज क्रमांक एक भरावा. दिलेल्या सूचना नीट वाचून अर्ज ‘सबमिट’ करायचा आहे. यानंतर आपल्याला एक संदेश येईल आपण यशस्वीरीत्या अर्ज भरला आहे. त्यानंतर अर्ज, स्लीप हे आपल्याकडे जतन करून ठेवणे व त्याची छायांकित प्रत काढून ठेवणे महत्त्वाचे आहे.

त्यानंतर पुढे गेल्यानंतर पाच पर्याय दिलेले असतील. त्यातील दोन पर्याय निवडायचे आहेत. यात ‘अपलोड फोटो अ‍ॅन्ड सिग्नेचर’ व शुल्क या दोन पर्यायांवर क्लिक करावे. आपले छायाचित्र अपलोड झालेले असेल पण सही अपलोड करावी लागेल. ती २० केबीपेक्षा जास्त नसावी. ती अपलोड केल्यानंतर ‘जतन करा’ या पर्यायावर जावे. त्यानंतर शुल्क भरण्याची प्रक्रिया पूर्ण करून ती पावतीही आपल्याकडे जतन करून ठेवा.

पुढे गेल्यानंतर आपला अर्ज क्रमांक व जन्मतारीख ठाकल्यानंतर ते सबमिट करावे. त्यांनतर आपली अर्ज प्रक्रिया पूर्ण होईल. ती झाल्यानंतर आपल्याला ऑनलाइन चाचणी द्यावी लागेल. त्यासाठी ‘लर्नर लायसन्स टेस्ट’ या पर्यायावर जावे. यात दिलेल्या सूचना वाचून पुढे जावे. भाषा हा पर्याय निवडल्यानंतर चाचणी सुरू होईल व त्यात किमान ६० टक्के गुण मिळाल्यानंतर आपले शिकाऊ लायसन्स डाऊनलोड करून त्या ठिकाणी आपण त्याची छाायांकित प्रत काढू शकतो. त्यानंतर सहा महिन्यांच्या आत आपल्याला कायमस्वरूपी लायसन्स काढण्याची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

कायमस्वरूपी परवाना

यासाठी अर्जदाराला शिकाऊ परवाना काढल्यानंतर सहा महिन्यांच्या आत पुढील प्रक्रिया करणे गरजेचे आहे. अन्यथा परत शिकाऊ परवाना काढावा लागेल. कायमस्वरूपी वाहन परवाना काढण्यासाठी शासनाने १ जुलैपासून चार महत्त्वाचे नियम जाहीर केले आहेत. यापुढे आता अर्जदाराला कायमस्वरूपी परवाना काढण्यासाठी आरटीओ कार्यालयात जावे लागणार नाही. मात्र आपल्या घराजवळील अधिकृत वाहन शिकाऊ प्रशिक्षण केंद्रात जाऊन तेथे प्रशिक्षण दिले जाईल, त्यात पास व्हावे लागेल.