28 February 2021

News Flash

5 हजारांत बुकिंग सुरू, होंडाची नवी ‘सीबी 300 आर’

दुचाकी बनवणारी दिग्गज कंपनी 'होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडिया' नवी मोटरसायकल लाँच करायच्या तयारीत

दुचाकी बनवणारी दिग्गज कंपनी ‘होंडा मोटरसायकल अँड स्कुटर इंडिया’ नवी मोटरसायकल ‘होंडा सीबी 300 आर’ भारतीय बाजारात लाँच करण्याच्या तयारीत आहे. याशिवाय या बाइकसाठी नोंदणी देखील सुरू करण्यात आली आहे. केवळ 5 हजार रुपयांमध्ये या बाइकसाठी नोंदणी करता येईल.

या बाइकमध्ये 6 स्पीड ट्रांसमिशनसह 286सीसीचं DOHC 4 वॉल्व लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर इंजिन देण्यात आलं आहे. नियो स्पोर्ट्स कॅफे बाइकच्या प्रेरणेतून या नव्या बाइकला डिझाइन करण्यात आलं आहे, तसंच अल्ट्रा मॉडर्न लुक देखील देण्याचा प्रयत्न कंपनीने केलाय. म्हणजेच रेट्रो आणि मॉडर्न असं समीकरण या बाइकमध्ये पाहायला मिळेल. यात एबीएस फीचरसह 296mm चा डिस्क ब्रेक आहे. Matte Axis Gray Metallic आणि Candy Chromosphere Red या दोन रंगांमध्ये ही बाइक उपलब्ध असेल. या बाइकला लाँच करण्याची तयारी कंपनीने केली आहे, पण नेमकी कधी ही बाइक लाँच केली जाणार याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिली नाही. KTM 390 Duke, BMW G 310 R आणि Royal Enfield Interceptor 650 यांसारख्या बाइकसोबत ‘होंडा सीबी 300 आर’ची टक्कर असणार आहे. अडीच लाख रुपयांच्या आसपास या बाइकची किंमत असण्याची शक्यता आहे.

फीचर्स –
सीटची उंची 779 एमएम आणि कर्ब वेट 143 किलोग्राम
फ्युअल टँक -10 लीटर
बाइकमध्ये 296 एमएमचा फ्रंट डिस्क आणि 220 एमएम रिअर डिस्कसह ड्युअल चॅनल एबीएस
सस्पेंशनसाठी पुढील बाजूला 41 एमएम इन्व्हर्टेड फॉर्क्स आणि 7-स्टेप अॅड्जस्टेबल मोनोशॉक सस्पेंशन
ट्यूब्यूलर टायर

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 17, 2019 2:58 pm

Web Title: honda cb300r booking started
Next Stories
1 टिकटॉकचा मनस्ताप; मानसोपचारतज्ज्ञांनी दिला इशारा
2 नेटफ्लिक्स, हॉटस्टार स्वत:च करणार सेन्सॉर बोर्डाचं काम
3 बीएसएनएलचा 399 रुपयांचा प्लॅन, दररोज मिळवा 3.21 जीबी डेटा
Just Now!
X