Honda ने आपली Honda CD 110 Dream ही बाइक नवीन बीएस6 इंजिनसह लाँच केली आहे. ही बाइक कंपनीने स्टँडर्ड आणि डीलक्स अशा दोन व्हेरिअंटमध्ये उतरवली आहे. होंडाच्या भारतीय बाजारातील अन्य बाइक्सच्या तुलनेत ही सर्वात स्वस्त बाइक ठरली आहे.

इंजिन, स्पेसिफिकेशन्स आणि कलर :-
होंडाच्या या बाइकची टक्कर भारतीय बाजारात हीरो स्प्लेंडर आयस्मार्ट, हीरो पॅशन प्रो, TVS Radeon, TVS स्टार सिटी प्लस, बजाज CT 110 आणि प्लॅटिना 110 H-Gear यांसारख्या बाइकसोबत असेल. बीएस6 इंजिनशिवाय कंपनीने नव्या बाइकमध्ये अन्य काही अपडेट केले आहेत. बाइकच्या बॉडीवर्कमध्ये थोडा बदल झाला आहे. याशिवाय अपडेटेड बाइक नवीन ग्राफिक्स, क्रोम एग्जॉस्ट शील्ड, बॉडी कलर मिरर्स आणि सिल्वर फिनिश अॅलॉय व्हील्ससोबत आली आहे. आधीपेक्षा सीट 15mm जास्त लांब देण्यात आलंय. सर्वात मोठा बदल अर्थातच इंजिनमध्ये झाला आहे. बाइकमध्ये आता बीएस-6, 109.51cc, फ्युअल-इंजेक्टेड इंजिन दिलं आहे. हे इंजिन 7500 rpm वर 8.6hp ची ऊर्जा आणि 5500 rpm वर 9.30 Nm टॉर्क निर्माण करतं. 4-स्पीड गिअरबॉक्स असलेल्या या बाइकमध्ये होंडाच्या अन्य बीएस6 टू-व्हीलर्सप्रमाणे सायलेंट-स्टार्ट फीचरही आहे. या बाइकमध्ये इंजिन स्टार्ट/स्टॉप स्विच, सीबीएस, DC हेडलँप, इंटीग्रेटेड हेडलँप बीम अँड पासिंग स्विच, ट्यूबलेस टायर, लांब आणि आरामदायक सीट आहे. या बाइकमध्ये होंडाची एन्हँस्ड स्मार्ट पॉवर टेक्नोलॉजी (eSP)देण्यात आली आहे. यामुळे फ्रिक्शन कमी होऊन परफॉर्मन्स आणि मायलेज वाढतो असा कंपनीचा दावा आहे. बाइकच्या फ्रंट आणि रिअर दोन्ही बाजूला 130mm ड्रम ब्रेक दिले आहेत. एकूण आठ कलरचे पर्याय असून 4 कलर स्टँडर्ड व्हेरिअंट आणि 4 कलर ऑप्शन डीलक्स व्हेरिअंटमध्ये आहेत. स्टँडर्ड व्हेरिअंटमध्ये ही बाइक ब्लू आणि ब्लॅक, केबिन गोल्ड आणि ब्लॅक, रेड आणि ब्लॅक व ग्रे आणि ब्लॅक अशा चार कलरच्या पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. तर, डीलक्स व्हेरिअंटमध्ये ब्लॅक, एथलेटिक ब्लू मेटॅलिक, जिनी ग्रे मेटॅलिक आणि इम्पीरिअल रेड मेटॅलिक अशा कलरच्या पर्यायांमध्ये आहे.

किंमत :-
Honda CD 110 Dream ही बाइक कंपनीने स्टँडर्ड आणि डीलक्स अशा दोन व्हेरिअंटमध्ये उतरवली आहे. बाइकची एक्स-शोरुम किंमत अनुक्रमे 64 हजार 505 रुपये आणि 65 हजार 505 रुपये ठेवण्यात आली आहे. होंडाच्या भारतीय बाजारातील अन्य बाइक्सच्या तुलनेत ही सर्वात स्वस्त बाइक ठरली आहे.