भारतात येत्या एप्रिल महिन्यापासून वाहनांसाठी नवे सुरक्षा नियम लागू होत आहेत. परिणामी सर्व कंपन्या आपल्या गाड्या नव्या फीचरसह अपडेट करत आहेत. होंडा कंपनीनेही आपल्या Honda Navi आणि Honda CD 110 Dream या दोन बाइक CBS अर्थात कम्बाइन्ड ब्रेकिंग सिस्टीमसह सादर केल्या आहेत. Honda Navi CBS ची किंमत 47 हजार 110 रुपये आहे. म्हणजेच सीबीएस सिस्टीम नसलेल्या व्हर्जनपेक्षा या बाइकची किंमत 1796 रुपयांनी अधिक आहे. तर Honda CD 110 Dream CBS च्या स्टँडर्ड व्हर्जनची किंमत 50,028 रुपये आणि डिलक्स व्हेरिअंटची किंमत 51,528 रुपये आहे. सीडी 110 च्या सीबीएस व्हर्जनची किंमत सीबीएस सिस्टीम नसलेल्या व्हर्जनपेक्षा 848 रुपयांनी अधिक आहे.

CBS अर्थात कम्बाइन्ड ब्रेकिंग सिस्टीमद्वारे पुढील आणि मागील ब्रेकचं कार्य विभागलं जातं. यामुळे बाइक थांबवण्यासाठी आपोआप अधिक ताकद मिळते. 1 एप्रिलपासून 125cc पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या बाइकमध्ये हे फीचर अनिवार्य करण्यात आलं आहे. सीबीएस वगळता या बाइकमध्ये मॅकेनिकली अन्य कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

Honda Navi –
या बाइकमध्ये अॅक्टिव्हाचं 109cc, सिंगल-सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन आहे. हे इंजिन 8 bhp पावर आणि 8.94 Nm पीक टॉर्क जनरेट करतं. बाइकच्या पुढील बाजूला टेलेस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूला मोनोशॉक आहे.

होंडा सीडी 110 ड्रीम –
या बाइकमध्ये 109cc, सिंगल-सिलिंडर इंजिन असून हे इंजिन 8.31 bhp ची पावर आणि 9.09 Nm पीक टॉर्क जनरेट करत. यामध्ये 4-स्पीड गिअरबॉक्स आहेत. बाइकच्या पुढील बाजूला टेलिस्कोपिक फोर्क्स आणि मागील बाजूला ट्विन शॉक आहे.