करोनामुळे आपलं आयुष्य पूर्णपणे बदलून गेलं आहे. करोनाची साथ ओसरल्यानंतरही जग पूर्वीसारखं राहणार नाही असं अनेक तज्ज्ञांचे म्हणणे आहे. आताच आपल्याला करोनासंदर्भातील अनेक गोष्टींमुळे आलेला बदल हळूहळू लक्षात येत आहे. हॅण्डशेक तसेच मिठी मारताना संसर्गाचा धोका असल्याने त्यासंदर्भात जागृत राहण्याचा सल्ला जाणाकार देतात. इतकचं काय घरातून बाहेर पडताना तोंडावर मास्क आणि हातात ग्लोव्हज आवश्यक झाले आहेत. त्याचबरोबर अगदी मॉलपासून, हॉटेलपासून ते इतर अनेक ठिकाणी प्रवेशद्वारावरच तुमच्या शरीराचे तापमान तपासले जाते.

अनेक ठिकाणी आता मेटेल डिटेक्टरबरोबर सुरक्षा रक्षकांच्या हातामध्ये आयआर थर्मामीटर म्हणजेच कपाळाजवळ पकडल्यानंतर शरीराचे तापमान सांगणारे यंत्र हमखास दिसू लागले आहे. अर्थात अशाप्रकारे तापमान तपासल्याने करोनाच्या संसर्ग पूर्णपणे थांबवता येत नसला तरी ताप असणाऱ्या व्यक्तींची लगेच ओळख पटवता येते. लक्षण दिसणारे करोनाबाधित रुग्ण सार्वजनिक ठिकाणी ओखळण्यासाठी या आयआर थर्मामीटरचा वापर केला जात आहे. या गोष्टीचा भविष्यात इतका वापर होणार आहे की आता स्मार्टफोन कंपन्यांनीही अशाप्रकारची सुविधा फोनमध्ये उपलब्ध करुन देण्यासंदर्भात विचार सुरु केला आहे. चीनमधील एका कंपनीने तर एक पाऊल पुढे जात अशाप्रकारे शरीराचे तापमान मोजण्याची सोय स्मार्टफोनमध्येच उपलब्ध करुन दिली आहे.

Till 1st June 2024 Mangal Gochar in Meen rashi Mahavisfot Angarak Yog on Hanuman Jayanti
१ जूनपर्यंत मीन राशीत ‘महाविस्फोट अंगारक’ योग; ‘या’ राशींचा भाग्योदय; प्रचंड धनासह प्रत्येक कामात मिळेल गती
Chaturgrahi Yog in meen rashi
Chaturgrahi Yog : १०० वर्षानंतर चतुर्ग्रही योग; ‘या’ राशींना मिळणार बक्कळ पैसा, होऊ शकतो मोठा धनलाभ
Budh Margi 2024
९ दिवसांनी ‘या’ राशींचे लोक होतील भाग्याचे धनी? हनुमान जयंतीनंतर बुधदेव मार्गी होताच उघडू शकतात उत्पन्नाचे नवे स्त्रोत
Gold Hits All Time High, 2400.35 doller an Ounce, global market gold price, global market gold high, all time gold high in world, Global Economic Uncertainty , gold,finance news, finance article, marathi news, vietnam, america,
सोन्याची विक्रमी तेजीची दौड कायम, जागतिक बाजारात प्रति औंस २,४००.३५ डॉलरचा उच्चांक

चीनमधील हुवाई (Huawei) कंपनीचा सबब्रँड असणाऱ्या ऑनरने (Honor) चीनमध्ये ऑनर प्ले फोर फाइव्ह जी सिरीज लॉन्च केली आहे. हा स्मार्टफोन एखाद्या सामान्य स्मार्टफोन सारखा दिसत असला तरी यामध्ये आयआर टेम्पप्रेचर सेन्सर्स आहेत. या सेन्सर्सच्या मदतीने व्यक्तीबरोबरच एखादी वस्तू आणि प्राण्यांच्या शरीराचे तापमान तपासता येऊ शकते. या सेन्सर्सच्या मदतीने उणे २० डिग्रीपासून ते १०० डिग्री सेल्सियसपर्यंतचे तापमान मोजता येईल असं सावा ऑनरने केला आहे.

या फोनला ६.८१ इंचांची फूल एचडी प्लस एससीडी डिसप्ले फ्रण्ड  स्क्रीन आहे. या स्क्रीनचे रेझोल्यूशन २४००  X १०८० पिक्सल्स इतके आहे. या मोबाइलमध्ये ३२ मेगापिक्सलचा पंच होल फ्रण्ट कॅमेरा आहे. या फोनमध्ये फाइव्ह जी तंत्रज्ञानाला सपोर्ट करणारे हिसिलीकॉन किरइन ९९०० चीपसेट तंत्रज्ञान आहे. हे तंत्रज्ञान हुवाईने स्वत: निर्माण केलेले आहे. फोनमध्ये आठ जीबी रॅम आणि १२८ जीबी स्टोअर आहे. ४० मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आणि ८ मेगापिक्सलचा टेलीशूटर कॅमेरा फोनमध्ये देण्यात आलेला आहे.

कंपनीने या सिरीजमध्ये ऑनर प्ले फोरचे साधे फोनही बाजारात आणले आहेत. या फोनमध्ये प्रो सिरिजप्रमाणे आयआर थर्मामीटरची सुविधा देण्यात आलेली नाही. या फोनमध्ये गुगल प्लेची सुविधा उपलब्ध नाही. म्हणजेच या फोनमध्ये प्ले स्टोअरवरुन अॅप्लिकेशन डाऊनलोड करता येणार नाही.

चीनमध्ये प्ले फोर प्रोची किंमत २९९९ युआन (म्हणजेच ३१ हजार ९९९ भारतीय रुपये) आहे तर आयआर थर्मामीटर नसणाऱ्या फोनची किंमत २८९९ युआन (म्हणजेच ३० हजार ९९९ भारतीय रुपये) इतकी आहे.