07 March 2021

News Flash

48MP कॅमेरा आणि पंचहोल डिस्प्ले , Honor View 20 चं आज ग्लोबल लाँचिंग

भारतात या स्मार्टफोनसाठी आगाऊ नोंदणी सुरू

ऑनर कंपनीचा 48 मेगापिक्सल कॅमेरा असलेला बहुप्रतिक्षित Honor View 20 या स्मार्टफोनचं आज ग्लोबल लाँचिंग आयोजित करण्यात आलं आहे. पॅरिसमध्ये हे आयोजन करण्यात आलं असून www.hihonor.com/global/ या संकेतस्थळावर लाँचिंगचा कार्यक्रम लाइव्ह पाहता येणार आहे. भारतात या स्मार्टफोनसाठी आगाऊ नोंदणी सुरू झाली आहे. 29 जानेवारी रोजी हा स्मार्टफोन भारतात उपलब्ध होणार आहे.

48 मेगापिक्सल रिअर कॅमेरा असलेला हा भारतात लाँच होणारा पहिला पंचहोल डिस्प्ले असलेला स्मार्टफोन आहे. या फोनच्या डिस्प्लेवर कॉर्नरमध्ये पंचहोलमध्ये फ्रंट कॅमेरा बसवला आहे. सेल्फीसाठी 25 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आलाय.

कंपनीने हा स्मार्टफोन चीनमध्ये डिसेंबर महिन्यात लाँच केला होता. तेव्हापासून या फोनबाबत बरीच चर्चा होती. हा मोबाइल 6 जीबी रॅम आणि 8 जीबी रॅम अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असेल. तसंच मेमरीच्या बाबतीतही 128 जीबी आणि 256 जीबी मेमरी अशाप्रकारचे दोन पर्याय असतील. भारतात या मोबाइलची किंमत 35 ते 40 हजार रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.

फिचर्सच्या बाबतीत सांगायचं झाल्यास यामध्ये 6.4 इंचाचा फुल एचडी डिस्प्ले असून हायसिलीकॉन किरीन ९८० प्रोसेसर आहे. 4000 mAh क्षमतेची बॅटरी असलेल्या या फोनमध्ये अत्याधुनिक अँड्रॉयड 9 ‘पाय’चा सपोर्ट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2019 1:32 pm

Web Title: honor view 20 global launch price features
Next Stories
1 एअरटेल : 1699 रुपयांत 365 वैधता आणि 365जीबी डेटा
2 पुण्यात फोक्सवॅगनच्या तंत्रज्ञान केंद्राचं उद्घाटन; 2000 कोटींची गुंतवणूक
3 पती पत्नी मिळून होम लोन घेताय? मग हे वाचाच
Just Now!
X