कोणी चांदीच्या ताटात जेवतं तर कोणी सोन्याच्या.. आपण बाबा सामान्य माणसं.. दोन वेळचं पोटभर जेवायला मिळतंय हे नशीब. मग अॅल्यूमिनयमचे ताट असो की केळीचे पान असो आपल्याला सगळेच सारखे. चांदी किंवा सोन्याच्या ताटात जेवण्याचे शौक बड्या लोकांचे. चांदीची, सोन्याची, चीनी मातीची, काचेची थाळी वगैरे सोडाच पण एक हॉटेल असेही आहे जिथे चक्क आयपॅडवर जेवण वाढले जाते. ‘आयपॅड’ हा शब्द वाचून तुम्हाला धक्का बसला असेल. पण हे खरं आहे. आता आयपॅडची किंमत तुम्हा आम्हाला माहिती असलेच त्यामुळे असा प्रकार वाचून धक्का बसणे साहाजिक आहे. पण, सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये एक हॉटेल आहे जिथे खरंच आयपॅडवर जेवण वाढले जाते

Viral : ‘येथे’ कमोडमध्ये वाढले जाते जेवण

Abuse of young woman, Kharghar,
खारघरमधील तरुणीवर अत्याचार
Shukra Gochar 2024
हनुमान जयंतीनंतर या ६ राशींचे नशीब चमकणार! मेष राशीमध्ये होणार शुक्राचे गोचर, नोकरदारांचे चांगले दिवस येणार
How to make solkadhi marathi recipe
recipe : चिकन, मटणाच्या जेवणासह हवी थंडगार सोलकढी? मालवणी पद्धतीने कशी बनवायची जाणून घ्या
puppy rescue
माणुसकीला सलाम! दोन भिंतीच्यामध्ये अडकलं कुत्र्याचं पिल्लू; भिंत फोडून काढले बाहेर, पाहा Viral Video

सॅन फ्रॅन्सिस्कोमध्ये ‘क्विन्स’ नावाचे हॉटेल आहे. जिथे जो कोणी ग्राहक जेवायला आला की त्याला आपण राजाच आहोत असे वाटल्याशिवाय राहणार नाही, कारण येथे ग्राहकाला चक्क आयपॅडमध्ये जेवण वाढले जाते. आता वीस हजारांहून अधिक किंमत असलेल्या आयपॅडवर आपल्याला जेवायला मिळते हे काही राजापेक्षा कमी आहे का? या हॉटेलची एक खास डिशही आहे. या डिशचे नाव आहे ‘अ डॉग इन सर्च ऑफ गोल्ड’ आता यात काय बरं असेल याची उत्सुकता तुम्हालाही असेल. आता या पदार्थाच्या चवीबद्दल आपल्याला काही महिती नाही, पण हा पदार्थ म्हणे आयपॅडमध्येच वाढला जातो. हा पदार्थ वाढल्यावर आयपॅडवर व्हिडिओ प्ले केला जातो. ज्यात एक कुत्रा म्हणे काहीतरी शोधत असतो. आता हा प्रकार पाहून आपण डोक्यावर हात मारला असता. पण असो चालायचंच! जगात काहीतरी हटके करणारेही असतातच म्हणा म्हणूनच तर अशी हॉटेल प्रसिद्ध होतात.