ताण तणाव आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. बऱ्याच आघाड्यांवर लढत असताना होणारी ओढाताण अनेकदा आपल्या सहनशक्तीच्या पलीकडे जाते. हे एवढं होतं की हातातलं काम टाकून जगाच्या दुसऱ्या टोकापर्यंत पळून जावंसं वाटतं. पण हातातलं काम थांबवणं प्रत्येक वेळेला शक्य नसतं. त्यामुळे सहन करायच्या पलीकडे ताण गेल्यावर स्वत:त स्वत:ला शांत करावं लागतं. ताण लगेच हलका करण्यासाठी आमची ही काही सजेशन्स

१. दीर्घ श्वास घ्या

ताण आल्यावर आपला श्वासोच्छ्वास जलद होतो. हृदयावर ताण येतो. यावेळी थोडंसं थांबून आपल्या श्वासावर नियंत्रण आणलं तरी लगेच थोडं बरं वाटत. तणावाच्या स्थितीत प्रत्येक वेळी हे करणं कठीण असतं पण याची सवय केली तर आपण अनेक ‘हाय स्ट्रेस’ सिच्युएशन्समध्ये स्वत:ला शांत ठेवू शकतो. दीर्घ श्वसनाच्या अनेक टेक्निकस् आहेत. इंटरनेटवर माहिती मिळवत आपल्याला सूट होईल अशी टेक्निक आपण वापरू शकतो. यासाठी अनेक अॅप्ससुध्दा उपलब्ध आहेत. त्यांचाही वापर करा उदा. ‘द माईंडफुलनेस अॅप’, ‘नाॅईसली’, ‘एसेन्स’

२. काहीतरी खा किंवा प्या

आपल्या आहाराचा आणि आपल्यावर येणाऱ्या ताणाचा मोठा संबंध आहे. अनेकदा नाश्ता किंवा जेवण न झाल्यामुळेही आपल्याला अस्वस्थ वाटू शकतं. अगदीच नाही तर आपण एक ग्लास पाणी तर नक्कीच पिऊ शकतो.

३. म्युझिक एेका

संगीताचा आपल्याला रिलॅक्स करतं. सध्या तर स्मार्टफोनमुळे आपण आपली आवडती गाणी आपण आपल्यासोबत घेत फिरू शकतो. त्याशिवाय रेडिओचाही पर्याय आहे. रिलॅक्स होण्यासाठी संगीत एेकत असताना फक्त त्या नादाकडे द्या. बाकी विचार नकोत.

४. एखादा काॅमेडी व्हिडिओ पहा

सध्या बरेच व्हिडिओ व्हायरल होत असतात. त्यातला एखादा मजेदार व्हिडिओ पहा. गूगल किंवा यूट्यूबवर ‘फनी व्हिडिओ’ सर्च करून कितीतरी व्हिडिओ पाहता येतील. आपण टीव्हीवर पाहत असलेल्या अनेक मजेदार जाहिराती यूट्यूबवर अाहेत. उदा. रणबीर कपूरची एशियन पेंट्सची जाहिरात. तुमचा आवडता काॅमेडी सीनही तुम्ही पाहू शकता.

५. आवडत्या सेंट, अत्तर किंवा कलोनचा वास घ्या

आश्चर्य वाटेल पण यामुळेही मूडमध्ये लगेच फरक पडतो. ‘सिट्रस’ प्रकारातली सेंट्स आणि कलोन्स जवळ बाळगली तर उत्तम.

 

६. थोडं चालून या

ताण जास्त झाला असेल  तर थोडं मोकळया हवेत फिरून या. वातावरणात बदल झाल्यामुळे मन शांत व्हायला मदत होते.

आणि सगळ्यात महत्त्वाचं…..

जर जास्तच अस्वस्थ वाटत असेल तर तातडीने तुमच्या कुटुंबीयांशी, मित्रांशी किंवा डाॅक्टरांशी संपर्क साधा.

[jwplayer iDKuun7v]