हिवाळ्याची चाहूल लागली की, कपाटात ठेवलेले लोकरीचे कपडे बाहेर येऊ लागतात. लोकरीचे कपडे खूपच उबदार असतात, त्यातून ते धुतले की सुकायलाही खूप वेळ लागतो म्हणून अनेकजण वारंवार लोकरीचे कपडे धुणं टाळतात. पण लोकरीच्या कपड्यात बॅक्टेरिया राहण्याची शक्यता असते. म्हणून लोकरीच्या कपड्यांची काळजी घेणं आवश्यक आहे. ती कशी घ्यायची यासाठी सोप्या टिप्स

हिवाळ्यात फिरायला जाताना ही काळजी घ्या

pune leopard marathi news, shirur leopard marathi news
कोंबड्यांच्या खुराड्यात बिबट्याची मादी कैद
children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
Sujay Vikhe Patil, terror-mongers,
दहशत माजविणाऱ्यांना चोख उत्तर द्या – डॉ. सुजय विखे पाटील
How To Make Gudi Padwa Sakhrechya Gathi At Home gudi padwa 2024
गुढी पाडव्यासाठी साखरेच्या गाठी यंदा बनवा घरीच, साखरेच्या बत्तास्यांची सोपी झटपट कृती

Beauty Tips : घरच्या घरी असे करा फ्रूट फेशियल

– लोकरीचे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुवू नये, कारण ते ताणून मोठे होतात म्हणूनच त्यांची काळजी घेणं आवश्यक आहे.
– लोकरीचे कपडे धुण्यासाठी सामान्य डिर्टजंट पावडर वापरू नये, यासाठी वेगळे लिक्वेड सोप येतात त्याचा वापर करावा.
– लोकरीचे कपडे घातल्यानंतर ते उन्हात वाळवून घ्यावे किंवा ड्रायरच्या मदतीने सुकवून घ्यावेत.
– लोकरीच्या कपड्यांत धुळीचे बारीक कण चिटकून राहतात म्हणूनच ते वापरल्यानंतर त्यावर हलकेच ब्रिस्टल ब्रश फिरवावा यामुळे धुळीचे कण निघून जातात.
– लोकरीच्या कपड्यांवर इस्त्री फिरवू नका, इस्त्री वापरायची झालीच तर स्ट्रीम मोडवर ठेवून ती वापरा.
– लोकरीचे कपडे बराच काळ कपाटात राहिल्यानंतर त्यांना कुबट वास येतो म्हणूनच ते कपडे पूर्णपणे सुकल्यानंतर त्यात डांबरगोळी ठेवून मगच ते कपाटात ठेवा.