News Flash

घरच्या घरी ‘असा’ करा हेअर स्पा

चमकदार केसांसाठी खास उपाय

आपले केस मुलायम आणि लांब असावेत असे बहुतांश महिलांना वाटते. मग कधी केस जास्त गळतात म्हणून तर कधी कोंडा झाला म्हणून, कधी केस वाढत नाहीत म्हणून तर कधी त्याच्या कोरडेपणासाठी पार्लरमध्ये जात विविध उपचार केले जातात. अनेकजणी बाजारात मिळणारी विविध प्रसाधनेही सातत्याने वापरतात. मात्र त्यामुळे केसांवर उपाय होण्याऐवजी अपायच होतो. पार्लरमध्ये जाऊन हेअर स्पा करुन घेणे हा तर सध्या ट्रेंड झाला आहे. यासाठी बरेच पैसेही खर्च करावे लागतात. पण घरच्या घरीही आपण अतिशय सोप्या पद्धतीने हेअर स्पा करु शकतो. पाहूया त्यासाठीच्या काही खास टिप्स

तेलाने मसाज करा

केसांना तेलाने चांगला मसाज करणे अतिशय आवश्यक असते. केसांच्या वाढीसाठी ते गरजेचे असते. त्यासाठी ऑलिव्ह ऑईल किंवा साध्या खोबरेल तेलाचा उपयोग करु शकता. याशिवाय बदामाचे तेलही केसांना चांगले पोषण देणारे ठरते. केसांना तेलाने चांगल्या पद्धतीने मसाज करा.

वाफ घ्या

केसांना वाफ घेणे हे अजिबात अवघड नसते. एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्या. त्यात टॉवेल बुडवून तो पिळून घ्या. या गरम टॉवेलने केसांना मसाज करा आणि तो केसांना बांधून ठेवा. यामुळे डोक्यातील रंध्रे उघडण्यास मदत होईल आणि रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होऊन केसांच्या वाढीस मदत होईल.

केस धुवा

वाफ घेतल्यानंतर केस एखाद्या सौम्य शाम्पूने धुवा. त्यामुळे केसातील धूळ आणि तेल निघून जाण्यास मदत होईल. दोनवेळा शाम्पू लावा आणि केस चांगल्या पद्धतीने धुवा.

कंडिशनिंग

शाम्पू झाल्यानंतर केसांना कंडिशनिंग करणे विसरु नका. केसांचे आरोग्य चांगले रहावे यासाठी ते अतिशय गरजेचे असते. केसांतील आर्द्रता टिकून राहण्यास यामुळे मदत होते. कंडिशनर २० मिनिटे लावून ठेवा. त्यानंतर केस धुवा.

हेअर मास्क

हा हेअर स्पामधील शेवटचा टप्पा आहे. बाजारात विविध प्रकारचे हेअर मास्क उपलब्ध असतात. ते आणून लावल्यास केसांचा पोत चांगला राहण्यास मदत होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 29, 2017 5:50 pm

Web Title: how to take hair spa treatment at home for good hairs
Next Stories
1 लिपस्टिक लावताना ‘या’ चुका टाळा
2 कंबरदुखी दूर करण्यासाठी हे आसन उपयुक्त
3 उद्यानांमुळे मुलांची एकाग्रता विकसित होण्यास मदत
Just Now!
X