येत्या काही दिवसांमध्ये विमान प्रवास करायचा विचार असेल तर तुमच्यासाठी चांगली बातमी आहे. आयसीआयसीआय बँकेने एक स्पेशल ऑफर आणली आहे. यानुसार बँकेच्या खातेधारकांना देशांतर्गत विमानाच्या तिकीटावर 10 टक्के सवलत दिली जात आहे.

ICICI बँकेच्या इंटरनेट बँकिंग सेवेचा वापर करुन यात्रा डॉट कॉमवर तिकीट बूकिंग करणाऱ्यांना या ऑफरचा लाभ मिळेल. ऑफरअंतर्गत देशांतर्गत विमान तिकीटावर जास्तीत जास्त 1200 रुपये डिस्काउंट मिळेल. ही ऑफर 29 मार्च 2021 पर्यंत आहे.

29 मार्चपर्यंत ऑफर :-
या ऑफरचा लाभ 29 मार्चपर्यंत दर रविवारी आणि सोमवारी घेता येईल. ऑफरअंतर्गत किमान 3,500 रुपयांचं ट्रांजेक्शन असणं गरजेचं आहे. बँकेच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ऑफरसाठी एका महिन्यात एक युजर एकदाच बूकिंग करु शकतो. ऑफर केवळ कन्फर्म बूकिंगवरच लागू असेल. तसेच, ICICI बँकेची ही मार्केटिंग ऑफर केवळ ICICI बँकेच्या खातेधारकांना आणि डेबिंट किंवा क्रेडिट कार्डधारकांनाच मिळेल.  ऑफरचा लाभ घेण्यासाठी युजरना ICICI बँकेच्या इंटरनेट बँकिंग सेवेद्वारे तिकीट बूक करावं लागेल. डिस्काउंटचा फायदा वेबसाइट http://www.yatra.com वर ICICI बँकेची इंटरनेट बँकिंग सेवा वापरणाऱ्यांना मिळेल. तिकीट बूक करताना ग्राहकांना प्रोमो कोड म्हणून ICICINB हा कोड टाकावा लागेल.