News Flash

तुम्हाला किडनीची समस्या असेल तर ‘हे’ पदार्थ खाऊ नका!

किडनीचा त्रास असेल तर चुकूनही हे पदार्थांचे सेवन करू नका. जर आपण त्यांचे सेवन केले तर आपली समस्या आणखी वाढू शकते.

जास्त प्रमाणात मिठाचं सेवन केल्यानं काही लोकांचे ब्लड प्रेशर वाढू शकतं. यामुळे किडनी खराब होण्याचा धोका अधिक असतो (फोटो:Pixabay)

आपल्या शरीरातील किडनी हा महत्त्वाचा अवयव आहे. यात थोडीशी जरी समस्या आली तरी आपल्या शरीरातील कार्य प्रणालीवर याचा परिमाण होतो. कारण रक्तातील नको असणारे घटक काढून रक्त शुद्ध करण्याचं महत्त्वाचं कार्य किडनी करत असते. शरीरातील पाण्याचा समतोल राखणं, आम्ल आणि अल्कलीचे प्रमाण व्यवस्थित ठेवणं, रक्तदाब स्थिर ठेवणं इ. महत्त्वाची कामेही किडनी करत असते. किडनीचा शरीरातील इतर संस्था व अवयवांच्या कार्याशीही संबंध असतो. म्हणूनच किडनी निकामी होण्यासारख्या आजारात व्यक्तीचे शारिरीक संतुलनही बिघडते. जर आपल्याला मधुमेह, उच्च रक्तदाबाची समस्या असेल, तर या आजारांचा परिणाम देखील किडनीवर होऊ शकतो. याने अनेक आजार होण्याची शक्यता असते. यामुळे आपण जर काही खाण्या-पिण्याकडे नीट लक्ष दिले तर किडनीच्या अनेक समस्या दूर होऊन आराम मिळेल.

– जर तुम्हाला दिवसभरात जास्त प्रमाणात सोडा किंवा शीतपेय पिण्याची सवय असेल तर वेळीच ही सवय कमी करा. यामुळे किडनीशी संबंधित आजारांची लागण होण्याची शक्यता आहे.

– शक्य तितके ब्रेडचे सेवन करणे टाळावे. कमी सोडिअम असलेले अन्न आहारात समाविष्ट करा.

– ब्राऊन राईसचा अतिरेक देखील किडनीला परिणाम करू शकतो. कारण यात जास्त प्रमाणात फॉस्फरस आणि सोडीयम असते.

– किडनीचा आजार उद्भवल्यास केळीचे सेवन करू नका. त्यात पोटॅशियम मुबलक प्रमाणात आढळते, जे किडनीसाठी हानिकारक आहे.

– किडनीचा आजार असलेल्या रुग्णांनी दुधापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत. यात फॉस्फरस, पोटॅशियम आणि प्रथिने अधिक प्रमाणात असल्याने रुग्णाच्या किडनीला त्रास होऊ शकतो.

– ज्यांना किडनीची समस्या आहे. त्यांनी संत्री, द्राक्षे, सफरचंद, क्रॅनबेरी ही फळे खाऊ नये.

– जास्त प्रमाणात मिठाचं सेवन केल्यानं काही लोकांचं ब्लड प्रेशर वाढू शकतं. यामुळे किडनी खराब होण्याचा धोका अधिक असतो. शिवाय किडनी स्टोन होण्याची भीती असते.

– किडनीचे आजार असलेल्या रुग्णांनी आहारात बटाट्याचे सेवन करू नये.

– किडनीचा त्रास असल्यास जेवणात टोमॅटोचा वापर करू नये. टोमॅटोमध्ये मुबलक प्रमाणात पोटॅशियम असते जे किडनीला हानी पोहोचवू शकते.

(टीप: या टिप्सचा वापर करण्यापूर्वी आपल्या फॅमिली डॉक्टरचा सल्ला घ्या)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 17, 2021 1:13 pm

Web Title: if you have kidney problems you should avoid eat this food scsm 98
Next Stories
1 अॅमेझॉन प्राइम डेज मध्ये टेक्‍नोची कॅमॉन १७ सिरीज; ४८ मेगापिक्‍सल सेल्‍फी तर ६४ मेगापिक्‍सल क्‍वॉड रेअर कॅमेरा!
2 ‘या’ प्रीपेड फोन रिचार्ज प्लॅनसह मिळवा नेटफ्लिक्स आणि अॅमेझॉन प्राइमचं फ्री सबस्क्रिप्शन!
3 बटाटे जास्त काळ टिकवण्यासाठी फॉलो करा ‘या’ टिप्स!
Just Now!
X