बजेट स्मार्टफोन बनवणारी कंपनी इन्फिनिक्सने (Infinix) आपला अजून एक स्वस्त स्मार्टफोन लाँच केलाय. कंपनीने इन्फिनिक्स हॉट 9 (infinix hot 9) हा नवीन फोन आणला असून हा फोन म्हणजे गेल्या वर्षी आलेल्या इन्फिनिक्ल हॉट 8 या स्मार्टफोनची पुढील आवृत्ती आहे. कमी किंमतीत ट्रिपल कॅमेरा सेटअप आणि दमदार बॅटरी ही फोनची खासियत आहे. सेल्फी कॅमेऱ्यासह एकूण चार कॅमेरे या फोनमध्ये आहेत. पंच होल डिस्प्ले असलेल्या या फोनची डिझाइनही एखाद्या महागड्या फोनप्रमाणे आहे.

Infinix Hot 9 चे फीचर्स :-
हा फोन XOS 6.0 वर आधारित Android 10 वर कार्यरत असेल. फोनवरती डाव्याबाजूला 8 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. तसेच या फोनमध्ये 16MP क्षमतेचा प्रायमरी सेंसर कॅमेऱ्यासह 2MP मॅक्रो लेंस आहे. याशिवाय 2MP क्षमतेचा लो-लाइट सेंसरही फोनमध्ये आहे. या फोनमध्ये फेस अनलॉक, AR Emoji, AR स्टिकर यांसारखे फीचर्स असून ड्युअल सिम सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज आहे.

किंमत :-
या फोनमध्ये 6.6 इंच IPS LCD डिस्प्ले असून फोनमध्ये Helio A25 1.8GHz ऑक्टा-कोर प्रोसेसर देण्यात आले आहे. पण, इंडोनेशियाच्या काही पब्लिकेशन्सकडून या फोनमध्ये Helio P35 प्रोसेसर असल्याचंही सांगण्यात आलं आहे. सध्या हा फोन केवळ इंडोनेशियामध्येच विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आला आहे. पण लवकरच हा फोन भारतातही विक्रीसाठी उपलब्ध केला जाईल. मात्र, नेमका कधी हा फोन भारतात उपलब्ध होईल याबाबत कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही.