21 September 2020

News Flash

Tiktok ची नाही भासणार गरज, Instagram ने लाँच केलं शानदार फीचर

15 सेकंदाचे छोटे व्हिडिओ शेअर करता येणार

भारताने Tiktok या चिनी शॉर्ट व्हिडिओ मेकिंग अ‍ॅपवर बंदी घातल्यानंतर आता Facebook ने एक नवीन फीचर लाँच केलं आहे. फेसबुकने आपल्या Instagram प्लॅटफॉर्मसाठी टिकटॉकप्रमाणे ‘रील्स’ (Reels) नावाचं नवीन फीचर आणलं आहे. याद्वारे युजर आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर 15 सेकंदाचे छोटे व्हिडिओ शेअर करु शकतील.

इंस्टाग्रामने भारतात नवीन शॉर्ट व्हिडिओ फीचर रील्स (Reels) लाँच केलं आहे. कंपनी Reels फीचर गेल्या वर्षीपासून ब्राझिलमध्ये टेस्ट करत होती, त्यासोबतच फ्रान्स, जर्मनी आणि भारतातही गेल्या महिन्यात या फीचरची टेस्टिंग सुरू झाली होती. आता हे फीचर कंपनीने अधिकृतपणे लाँच केलं आहे. Instagram च्या या नव्या सर्व्हिसमध्ये टिकटॉकप्रमाणे अनेक फीचर्स मिळतील. याद्वारे युजर्स अ‍ॅपवर व्हिडिओ बनवू शकतात, क्रिएटिव्ह फिल्टर आणि म्युजिक अ‍ॅड करुन शेअर करु शकतात. यामध्ये टिकटॉकप्रमाणे लोकप्रिय गाणे, ट्रेंड किंवा चॅलेंजसह 15 सेकंदाचा व्हिडिओ बनवता येतो. यासाठी म्युजिक लाइब्रेरीमधून ऑडियो, स्पीड, इफेक्टस आणि टाइमरचे ऑप्शन उपलब्ध आहेत. व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये बदल करु शकतात किंवा व्हिडिओचा स्पीडही कंट्रोल करता येतो. व्हिडिओ बनवल्यानंतर युजर्स आपल्या इंस्टाग्राम स्टोरीजमध्ये शेअर करु शकतात. इंस्टाग्रामचं हे फीचर अ‍ॅपमध्येच आहे, त्यामुळे यासाठी नवीन अ‍ॅप डाउनलोड करावं लागत नाही.

फेसबुकने यापूर्वी 2018 मध्ये टिकटॉकला टक्कर देण्यासाठी Lasso हे अ‍ॅपही लाँच केलं होतं. पण जुलैमध्ये ते अ‍ॅप बंद करण्यात आलं. त्यानंतर आता कंपनीने इंस्टाग्राममध्ये रील्स फीचरद्वारे कंपनीने टिकटॉकला पर्याय दिला आहे. टिकटॉक बॅन झाल्यानंतर अनेक अन्य अ‍ॅप्स लोकप्रिय ठरत आहेत. त्यामुळे इंस्टाग्रामच्या रील्स फीचरलाही चांगला प्रतिसाद मिळण्याची शक्यता आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 6, 2020 2:37 pm

Web Title: instagram reels feature officially launched facebooks short form video answer to tiktok check details sas 89
Next Stories
1 Xiaomi Independence Day Sale : ‘रेडमी K20 प्रो’वर 4,000 रुपये डिस्काउंट
2 सॅमसंगने आणला नवीन फोल्डेबल फोन Galaxy Z Fold 2, जाणून घ्या फीचर्स
3 सहा कॅमेऱ्यांचा Realme 6 Pro आला नवीन व्हेरिअंटमध्ये, जाणून घ्या किंमत आणि फीचर्स
Just Now!
X