– डॉ. निखिल मोदी

७ एप्रिल जागतिक आरोग्य दिन आपण साजरा करतोय पण आपण आपल्या आहारातील काही मूलभूत घटकांबद्दल आपण कधी जाणून घेतलंय का? जाणून घेऊयात ‘आयोडीन’ हा आपल्या दैनंदिन आहारातील अत्यावश्यक पोषक घटक आहे. आपली पचनसंस्था, शरीराची वाढ आणि विकास यावर नियंत्रण ठेवण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या थायरॉईड हार्मोन्सच्या निर्मितीसाठी आयोडीन अतिशय गरजेचे असते. प्रत्येक व्यक्तीला, खासकरून लहान बाळे आणि गर्भवती स्त्रियांना योग्य प्रमाणात आयोडीन मिळत राहणे खूप आवश्यक असते. गर्भार काळात आणि लहान वयात शरीरातील हाडे आणि मेंदूच्या विकासासाठी शरीराला थायरॉईड हार्मोन्स हवे असतात. एका अनुमानानुसार जवळपास ३५० दशलक्ष लोकांच्या शरीरात आयोडीनची कमतरता असते आणि त्यामुळे त्यांना अनेक आजार, शारीरिक समस्या सहन कराव्या लागतात. याचे प्रमुख कारण म्हणजे हे लोक अपुरे आयोडीन असलेले मीठ वापरतात. भारतासारख्या विशाल देशामध्ये आयोडीनच्या कमतरतेमुळे निर्माण होणाऱ्या शारीरिक समस्या टाळण्याचा आणि प्रत्येक व्यक्तीला दररोज योग्य प्रमाणात आयोडीन मिळत राहावे यासाठी रोजच्या जेवणातून योग्य प्रमाणात आयोडीन असलेले मीठ वापरणे हा सर्वात सोपा उपाय आहे.

Benefits Of Eating Poha With Lemon Juice And Kothimbir
पोहे बनवताना ‘हा’ पदार्थ वरून टाकायला अजिबात विसरु नका; प्रमाण किती हवं? चव वाढेलच पण हे फायदेही पाहा
sleep fundamental right
Right to Sleep : भारतात झोप हा खरंच मूलभूत अधिकार आहे का?
what is learning disorder marathi, learning disorder marathi article
Health Special: अध्ययन अक्षमता म्हणजे काय ? अशा मुलांसाठी काय करायचं?
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

आयोडीन हे जास्त करून मासे, दुग्धजन्य पदार्थ आणि अंड्यांमध्ये असल्याकारणाने शाकाहारी व्यक्तींना रोजच्या रोज पुरेश्या प्रमाणात आयोडीन मिळणे कठीण असते. वेगन आणि शाकाहारी दैनंदिन आहारात आयोडीन कमी प्रमाणात असल्यामुळे बहुतांश लोकांना इतर मार्गाने आयोडीन मिळवणे गरजेचे असते. भारतात मातीमध्ये आयोडीनची कमतरता आहे, अशा मातीमध्ये पिकवल्या जाणाऱ्या अन्नपदार्थांमध्ये देखील आयोडीन कमी असते, त्यामुळे खाण्यामध्ये आयोडीनच्या कमतरतेची समस्या अधिक वाढते. आपले वय कितीही असो आणि जीवनशैली कशाही प्रकारची असो, पुरेशा प्रमाणात आयोडाइज्ड मीठ वापरणे अत्यंत गरजेचे आहे, ही आपल्या शरीराची अत्यावश्यक गरज आहे.

आयोडीनच्या कमतरतेमुळे सर्वाधिक धोका स्त्रिया आणि लहान मुलांना निर्माण होतो. गरोदर असताना पोषक आहार घेणे महत्त्वाचे असते हे बहुतांश मातांना ठाऊक असते पण गर्भाच्या मेंदूच्या वाढीसाठी आयोडीन अत्यंत गरजेचे आहे ही बाब मात्र खूपच कमी स्त्रियांना माहिती असते. गरोदर काळात स्त्रीच्या शरीराला अतिरिक्त प्रमाणात आयोडीन गरजेचे असते कारण गर्भालाही पुरेशा प्रमाणात आयोडीनचा पुरवठा व्हावा लागतो. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या आठवड्यापासूनच स्त्रीच्या शरीराची आयोडीन आणि थायरॉईड हार्मोन्सची मागणी वाढलेली असते हे माहिती नसल्यामुळे अनेक स्त्रिया अजाणतेपणाने आयोडीनच्या कमतरतेच्या शिकार बनतात. हे टाळण्यासाठी त्यांना अतिरिक्त प्रमाणात आयोडीन पुरवणे गरजेचे असते. सर्व गर्भवती आणि स्तनपान करवणाऱ्या मातांना दररोज पुरेशा प्रमाणात आयोडीन मिळणे अत्यंत महत्त्वाचे आहे. (२५० एमसीजी)

विकसनशील देशांमध्ये आयोडीनच्या कमतरतेची समस्या तीव्र असली तरी विकसित आणि इतर विकसनशील देशांमध्ये देखील ती मोठ्या प्रमाणावर आढळून येते. संपूर्ण जगभरात मानसिक आजारांचे सर्वात मोठे आणि सहज टाळता येण्याजोगे कारण आयोडीनची कमतरता हे आहे. संशोधनातून हे आढळून आले आहे की, मेंदूचा विकास, मेंदूची संरचना आणि यंत्रणा यांच्या विकासावर आयोडीनचा खूप मोठा प्रभाव होत असतो. मेंदूची आकलन क्षमता, आयोडीनची कमतरता आणि आयोडीन सप्लिमेंटेशन यावरील संशोधनातून हे निष्कर्ष आढळून आले आहेत.

आयोडीनच्या कमतरतेची समस्या अतिशय कमी खर्चात टाळता येऊ शकते. मिठाच्या आयोडायझेशनमुळे स्त्रिया व लहान मुलांसहित कोट्यवधी भारतीयांना आरोग्याचे आणि सुखकर आयुष्याचे वरदान मिळाले आहे. आयोडीन ग्लोबल नेटवर्कनुसार (आयजीएन) भारतात मिठाचे आयोडायझेशन या एका उपायामुळे १९८५ पासून ५.४ बिलियन आयक्यू पॉईंट्सचा बचाव केला आहे, दरवर्षी ३०० मिलियन आयक्यू पॉइंट्सचा बचाव होत आहे आणि मुलांच्या मेंदूच्या क्षमतेचा ऱ्हास होण्याचे टाळून दरडोई राष्ट्रीय उत्पादनात १.४% योगदान यामुळे मिळत राहील असेही अनुमान आहे. आपल्या दररोजच्या आहारात योग्य प्रमाणात आयोडाइज्ड मीठ वापरल्याने गर्भपात, जन्मतःच बालक मृत असणे या समस्या टाळता येऊ शकतात. गर्भात असताना आणि जन्माला आल्यानंतर बाळाच्या शारीरिक आणि मानसिक वाढीवर याचा सकारात्मक परिणाम होऊ शकतो.

तुम्ही तुमच्या दररोजच्या जेवणात, खाण्यात चांगल्या दर्जाचे ब्रँडेड आयोडाइज्ड मीठ वापरून अतिशय कमी खर्चात आयोडीनच्या कमतरतेपासून स्वतःला, स्वतःच्या कुटुंबाला दूर ठेऊ शकता. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी प्रतिज्ञा घेऊया आणि आयोडीनच्या कमतरतेच्या समस्येला प्रतिबंध घालून निरोगी राष्ट्र निर्माण करू या.

(लेखक कन्सल्टन्ट, डिपार्टमेंट ऑफ रेस्पिरेटरी, क्रिटिकल केअर अँड स्लीप मेडिसिन, अपोलो हॉस्पिटल आहेत )