06 December 2019

News Flash

तुमच्या मुलाच्या आहारातून ‘आय’ गायब आहे का?

आयोडिन हे सर्वसामान्यपणे जेवणातून मिळतेच असे नाही, पण ते थायरॉइड हार्मोन्सच्या सिंथेसिससाठी आवश्यक असते.

– डॉ. रंजना धनू
आयोडिनसारखा सूक्ष्म पोषक घटक तुमच्या मुलाची योग्य वाढ आणि विकासासाठी आवश्यक आहे. पोषक घटकांच्या कमतरतेमुळे विशेषतः ‘आय’चे (आयोडिन) वाढीच्या वयातल्या मुलांनी योग्य प्रमाणात सेवन केले नाही, तर ती चिंतेची बाब ठरू शकते. कारण त्यामुळे आकलनविषयक आणि संभाव्य शारीरीक वाढीशी संबंधित कायमस्वरुपी परिणाम होऊ शकतात. आयोडिन हे सर्वसामान्यपणे जेवणातून मिळतेच असे नाही, पण ते थायरॉइड हार्मोन्सच्या सिंथेसिससाठी आवश्यक असते. थायरॉइडच्या कामासाठी तो अतिशय महत्त्वाचा घटक असल्यामुळे आयोडिनचे योग्य प्रमाणात सेवन करणे हे शालेय विद्यार्थ्यांसह चेतापेशींच्या विकासासाठी महत्त्वाचे आहे.

मुलांमधील कुपोषणाची समस्या भारताने बऱ्याच अंशी कमी केली असली, तरी अजून खूप काही करणे बाकी असल्याचे नुकत्याच प्रदर्शित करण्यात आलेल्या पहिल्या कॉम्प्रिहेन्सिव्ह नॅशनल न्यूट्रिशन सर्व्हेमध्ये (सीएनएनएस) नमूद करण्यात आले आहे. सरकारी योजनांमुळे 1 ते 4 वर्ष वयोगटातील मुलांमध्ये असणारी अ जीवनसत्व तसेच आयोडिनची कमतरता कमी होण्यास मदत झाली आहे. सीएनएनएसच्या आकडेवारीनुसार शालेय वयातील मुले आणि किशोरवयीन मुलांना अजूनही कुपोषणाचा धोका असून त्यासंदर्भात बराच मोठी व्याप्ती गाठणे आवश्यक आहे. या सर्वेक्षणात असेही नमूद करण्यात आले आहे, की आयोडिन, झिंक, फोलेट, लोह, बी 12, जीवनसत्व अ आणि ड हे विकास आणि वाढीसाठी आवश्यक आहे.

सुरुवातीच्या वयात मुलांना मिळणाऱ्या पोषकघटकांमुळे त्यांच्या मेदूंचा चांगला विकास होतो. युनिसेफच्या अहवालामध्ये आयुष्याचे पहिले एक हजार दिवस किंवा गर्भधारणेपासून दोन वर्षांपर्यंतच्या कालावधीत मुलांचा मेंदू तसेच मज्जासंस्थेचे आयुष्यभराचे आरोग्य, वाढ आणि विकास होत असतो. सूक्ष्म पोषकगचकांच्या कमतरतेमुळे म्हणजेच आयोडिन, लोह, फॉलिक असिड, अ जीवनसत्व तसेच झिंकची कमतरता ही ‘छुपी भूक’ समजली जाते आणि ती जागतिक सार्वजनिक आरोग्य समस्या झाली असून भारतासारख्या विकसनशील देशात तयार झाली आहे.

आयोडिनची कमतरता ही मानसिक गतीमंदतेवरील जगातील एकमेव प्रतिबंधात्मक गोष्ट आहे. आयोडिनच्या कमतरतेमुळे विकसनशील मेंदूचा कधीही भरून न येणारा नाश होतो. विशेषतः गर्भारपण आणि लहान वयाच्या प्राथमिक टप्प्यावर त्यामुळे मोठा बिघाड होऊन त्यातून मानसिक दोष किंवा बौद्धिक क्षमतेचा ऱ्हास होऊ शकतो. युनिसेफ अहवालामध्ये असे नमूद करण्यात आले आहे, की आयोडाइज्ड मीठ हे जगभरातील 86 टक्के दशांत उपलब्ध असते. यामुळे आयोडिन पोषणात वाढ झाली असून जागतिक स्तरावर या समस्येचे बऱ्याच अंशी उच्चाटन झाले आहे.

आयओडिनच्या कमतरतेमुळे होणारा सर्वात गंभीर परिणाम – गतीमंदत्व किंवा खुजेपणा जवळपास संपल्यात जमा आहे, गॉइटरची उदाहरणे खूप कमी झाली आहेत, मृत बाळ जन्मण्याची किंवा प्रतिकुल गर्भारपणाची उदाहरणे कमी जाली आहेत आणि जगभरातील लाखो मुलांचा मानसिक विकास तसेच वाढ जपली जात आहे. मात्र, आजही जगभरात दरवर्षी 19 दशलक्ष बाळांना गर्भारपणात आयोडिनचे कमी प्रमाणात सेवन झाल्यामुळे मेंदूत कायमचा बिघाड होण्याचा धोका कायम आहे. नवजात बाळाच्या मानसिक आरोग्याच्या संरक्षणामध्ये तसेच सहा महिने ते 15 वर्ष वयाच्या मुलांच्या मेंदूचे आयोडिन कमतरतेच्या परिणामांपासून संरक्षण करण्यासाठी आयोडिनयुक्त मिठाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे.

आयोडिनचा समावेश असलेल्या पदार्थांमध्ये समुद्री जलचर, अंडी, दुग्धजन्य पदार्थ, आयोडिनयुक्त मीठ या सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांचा समावेश आहे. मात्र, बहुतेक देशांमध्ये माती तसेच पर्यावरणात आयोडिनचे विषम वितरण झालेले असल्यामुळेही आयोडिनची कमतरता तयार होते. कित्येक देशांमध्ये मातीतील आयोडिन वेगाने कमी होत असल्यामुळे पर्यायाने त्यात पिकणाऱ्या अन्नपदार्थांतही आयोडिनची कमतरता दिसून येते. अन्नसाखळीतील आयोडिनचे प्रमाण देशातील भौगिलिक वैशिष्ट्यांवर अवलंबून असते. यावर मात करण्यासाठी आणि जनतेमधील आयोडिन कमतरता कमी करण्यासाठी आयोडिनयुक्त अन्नपदार्थ दर्जाचे मीठ म्हणजेच मीठामध्ये आयोडिनचा (जागतिक सॉल्ट आयोडायझेशन) समावेश केला गेला.

म्हणूनच मुलांना त्यांच्या जेवणातून पुरेसे आयोडिन मिळत आहे, की नाही यावर देखरेख करणे महत्त्वाचे आहे. बरीच मुले खाण्याच्या बाबतीत चोखंदळ असतात व विशिष्ट प्रकारचेच पदार्थ खातात. किंवा काही मुलांना विशिष्ट पदार्थांची अलर्जी असते, पण ते पदार्थ मुलांना दिले जात नाही. मात्र, खाण्यातून पुरेसे आयोडिन किंवा आयोडिनयुक्त मीठ शरीरात जात नसेल, तर त्याची कमतरता तयार होऊन अती मोठे थायरॉइड किंवा गॉइटर तयार होते. म्हणून पालकांच्या डॉक्टर किंवा बालरोगतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार मुलांच्या आयोडिन सेवनावर देखरेख करणे आवश्यक आहे. सारांश सांगायचा झाल्यास, आयोडिनयुक्त मिठाचा वापर करा. ते तुमच्या मुलाचा आहाराचा अविभाज्य घटक आहे.

(लेखिका खार येथील हिंदुजा हॉस्पिटलमध्ये प्रसूतीरोग तज्ज्ञ आहेत.)

First Published on December 2, 2019 3:16 pm

Web Title: is iodin missing from your childs diet nck 90
Just Now!
X