टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओ पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली असून याअंतर्गत ग्राहकांना मोफत हाय स्पीड डेटा देत आहे. कंपनीकडून आपल्या ग्राहकांना 5 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा अगदी मोफत दिला जात आहे. पण, ही ऑफर कंपनीकडून काही निवडक ग्राहकांनाच दिली जातेय.

एकूण 10GB फ्री डेटा –
अनेक युजर्सनी कंपनीकडून मोफत 2GB डेली अ‍ॅड ऑन डेटा पॅक मिळाल्याच्या पोस्ट्स सोशल मीडियावर शेअर केल्या आहेत. या युजर्सना 5 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा म्हणजे एकूण 10GB अतिरिक्त डेटा मोफत मिळाला आहे. पण, कोणत्या युजर्सना कंपनीकडून मोफत डेटा दिला जातोय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. अनेकांना ‘रँडम’ पद्धतीने हा डेटा मिळालाय. तुम्हाला फ्री डेटा मिळाला आहे की नाही हे तुम्ही ‘माय जिओ’ अ‍ॅपच्या ‘माय प्लॅन्स’ सेक्शनमध्ये जाऊन चेक करु शकतात. इथे तुम्हाला डेटा पॅक टायटलमध्ये डीटेल्स दिसतील. जर तुम्हाला अतिरिक्त डेटा मिळाला असेल तर तुमच्या सध्याच्या अ‍ॅक्टिव्ह प्लॅनसोबत अतिरिक्त डेटाही दिसेल.

यापूर्वी एप्रिल महिन्यातही कंपनीकडून अशाचप्रकारे 4 दिवसांच्या वैधतेसह दररोज 2GB डेटा ग्राहकांना मोफत देण्यात आला होता.