रिलायन्स जिओनं अस्सल भारतीय ‘JioPages’ नावाचं नवं मोबाइल ब्राउझर लॉन्च केलं आहे. आठ भारतीय भाषांमध्ये हे उपलब्ध असून यामध्ये डेटा सुरक्षित ठेवण्यावर भर देण्यात आला आहे. तसेच यामध्ये युजरला चांगल्या ब्राउझिंगचा अनुभव मिळेल असा दावा कंपनीकडून करण्यात आला आहे. पहिल्यांदाच गुगलच्या ‘प्ले स्टोअर’वर मंगळवारी ते उपलब्ध झालं.

JioPages ब्राउझर क्रोमियम बिल्क इंजिनवर विकसित करण्यात आलं आहे. तसेच हे अधिक वेगानं इंजिन मायग्रेशनद्वारे चांगल्या ब्राउझिंगचा अनुभव देतं. याशिवाय चांगलं वेबपेज रेंडरिंग, अधिक वेगानं पेज लोड करणे, चांगलं मीडिया स्ट्रिमिंग, इमोजी डोमेन सपोर्ट आणि एनस्क्रिप्शन सपोर्ट अशा लेटेस्ट सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत.

लेटेस्ट व्हर्जनमध्ये करता येणार अपग्रेड

जिओच्या एका प्रवक्त्याने या ब्राउझरबाबत अधिकृत माहिती दिली. मात्र, यातील सुविधांची माहिती दिली नाही. दरम्यान, सुत्रांच्या माहितीनुसार या ब्रायउझरचं यापूर्वीच व्हर्जन १४ मिलियन पेक्षाही जास्त युजर्सनी डाउनलोड केलं होतं. या सर्व युजर्ससाठी नवं व्हर्जन टप्प्याटप्याने अपडेट केले जातील. JioPages हे ब्राउझर पूर्णपणे भारतात तयार करण्यात आलं आहे. इंग्रजीशिवाय हिंदी, मराठी, तमिळ, गुजराती, तेलूगू, मल्याळम या आठ भारतीय भाषांना हे ब्राउझर सपोर्ट करतं.

डेटा प्रायव्हसीला धोका नाही

बेस सिक्युरिटी आणि डेटा सिक्युरिटीबाबात यामध्ये फोकस करण्यात आला आहे. यामुळे युजर्सना त्यांच्या माहितीचा संपूर्ण ताबा मिळेल. मुख्य फीचरमध्ये पर्सनलाइज्ड होम बटनही आहे. तसेच युजरला या सर्च इंजिनला डिफॉल्ट सेटिंगवर ठेवण्याचा पर्यायही यामध्ये आहे. यामध्ये goole, Bing, MSN, Yahoo या सर्च इंजिनचा समावेश आहे. लवकर आणि सोप्या पद्धतीनं हे वापरता यावं यासाठी यामध्ये यूजरला होमस्क्रिनवर आपल्या आवडत्या वेबसाईटची लिंक पिन करुन ठेवता येते.