रिलायन्स जिओने आपल्या JioFiber ब्रॉडबँड वापरणाऱ्या ग्राहकांसाठी एक नवीन ऑफर आणली आहे. कंपनीने जिओफायबरच्या लाँग टर्म प्लॅन्सची वैधता ३० दिवसांनी वाढवली आहे. लाँग टर्म प्लॅन वापरणाऱ्या ग्राहकांना आता ३० दिवस अतिरिक्त वैधता मिळेल. जाणून घेऊया सविस्तर

जिओफायबरचा ३६० दिवस वैधता असलेल्या प्लॅनवर म्हणजे वार्षिक प्लॅनवर आता ३० दिवस अतिरिक्त वैधता मिळेल. तर, सहा महिने वैधता असलेल्या म्हणजेच १८० दिवस वैधता असलेल्या प्लॅनवर आता १५ दिवस अतिरिक्त वैधता मिळेल. दोन्ही प्लॅनमधील अन्य सर्व सेवा सारख्याच असतील.

कंपनीकडे ३९९ रुपये, ६९९ रुपये, ९९९ रुपये, १४९९ रुपये, २४९९ रुपये, ३९९९ रुपये आणि ८४९९ रुपये असे प्लॅन्स आहेत. JioFiber ने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये आपले प्लॅन अपडेट केले होते. त्यानंतर जिओ फायबर प्लॅनची सुरूवातीची किंमत ३९९ रुपये झाली. बेसिक प्लॅनमध्ये 30Mbps च्या स्पीडसह अनलिमिटेड अपलोड आणि डाउनलोडिंगची सेवा मिळते. तर, ८४९९ रुपयांच्या प्रीमियम प्लॅनमध्ये 1Gbps चा अपलोड आणि डाउनलोड स्पीड मिळतो. याशिवाय, नेटफ्लिक्स, अ‍ॅमेझॉन प्राइम, डिझ्नी + हॉटस्टार VIP, सोनी LIV, झी 5, वूट सिलेक्ट अशा अ‍ॅप्सचं मोफत सबस्क्रिप्शनही मिळेल. याशिवाय सर्व प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंगचा लाभ मिळतो. पण, अतिरिक्त वैधतेच्या ऑफरचा फायदा कधीपर्यंत घेता येईल, किंवा या ऑफरसाठी अखेरची तारीख कोणती याबाबत मात्र कंपनीकडून अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.