Kawasaki कंपनीने आपली सुपरस्पोर्ट बाइक 2019 Ninja ZX-10R लाँच केली आहे. 2018 साली आलेल्या ZX-10R ची ही पुढील आवृत्ती आहे. 13.99 लाख रुपये इतकी या बाइकची एक्स-शोरूम किंमत आहे. 2018 च्या ZX-10R पेक्षा ही बाइक किंमत 1.2 लाख रुपयांनी महाग आहे. इतकी जास्त किंमत असूनही ही बाइक तिच्या प्रकारातील सर्वाधिक परवडणाऱ्या किंमतीची बाइक आहे. किंमत कमी असावी यासाठी कंपनीने ही बाइक भारतात असेंबल केली आहे.

गेल्या महिन्यापासूनच या बाइकसाठी बुकिंग सुरू झाली होती. 1.50 लाख रुपये इतकी बुकिंगची किंमत आहे. पुढील महिन्यापासून अर्थात जूनमध्ये या बाइकची विक्री सुरू होणार आहे. 2018 च्या मॉडलप्रमाणे ही बाइक देखील मर्यादित संख्येमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असेल. लक्ष्य पूर्ण झाल्यानंतर विक्री थांबवण्यात येईल. बाइकच्या किती युनिट्सची विक्री केली जाईल याची मात्र अद्याप माहिती मिळालेली नाही.

Bengaluru company charges
चक्क झाडाला मिठी मारण्यासाठी ही कंपनी आकारतेय १५०० रुपये! नेटकरी म्हणे, “मार्केटमध्ये आला नवा Scam”
IIFL Finance, selling shares, shareholders
आयआयएफएल फायनान्स हक्कभाग विक्रीद्वारे १,२७२ कोटी रुपये उभारणार
Yamaha introduces vibrant new color options across the MT15 V2 Fascino and Ray ZR portfolios Know Features And price
ब्लूटूथ कनेक्टिव्हिटीसह यामाहा इंडियाने ‘या’ दुचाकींना केलं उपडेट; पाहा कलर ऑप्शन…
Pawan Hans released notification for Associate Helicopter Pilot posts Check Details Here
Pawan Hans Bharti 2024: पवन हंस अंतर्गत ‘या’ पदासाठी होणार भरती; चार लाखांपर्यंत मिळणार पगार, असा करा अर्ज

या बाइकमधील सर्वात मोठा बदल म्हणजे नवी मोटर. यामध्ये पावरट्रेन 998cc इन-लाइन फोर-सिलिंडर, लिक्विड-कुल्ड मोटर इंजिन आहे. या मोटरमध्ये फिंगर फॉलोअर वॉल्व अॅक्चुअॅशनचा वापर करण्यात आला आहे. यापूर्वीच्या मॉडलमध्ये टॅपेट स्टाइल वॉल्वचा वापर व्हायचा. याद्वारे 20 टक्के वजन कमी होतं आणि 3hp अधिक पावर मिळते. म्हणजेच आता ही बाइक 203hp पावर जनरेट करते. Kawasaki च्या या सुपर स्पोर्ट्स बाइकची CBR1000RR(किंमत -16.41 लाख रुपये) आणि BMW S1000RR(किंमत – 18.05 लाख रुपये) या बाइकसोबत स्पर्धा असेल.