20 September 2018

News Flash

…तरच कॉमर्स शाखेत प्रवेश घ्या

आपली आवड आणि पुढील संधी लक्षात घ्यायला हव्यात

१० वीची परीक्षा झाली की अनेक पालकांना आणि विद्यार्थ्यांनाही कोणत्या शाखेत प्रवेश घ्यायचा हा यक्षप्रश्न असतो. सध्या करीयरचे वेगवेगळे मार्ग उपलब्ध झाले असतील तरीही १० वी नंतर किमान २ वर्षाचे शिक्षण कला, वाणिज्य आणि शास्त्र या पारंपरिक शाखेत घेण्यालाच प्राधान्य दिले जाते. तरीही १० वी पर्यंत अनेकांना आपली नेमकी आवड समजलेली नसल्याने कोणत्या शाखेत प्रवेश घ्यावा ते समजत नाही. ज्यांना खूप जास्त मार्क आहेत किंवा डॉक्टर आणि इंजिनियर व्हायचे पक्के आहे ते आपसूकच शास्त्र शाखेत प्रवेश घेतात. मग राहीलेल्यांना कला शाखा की वाणिज्य असा प्रश्न पडतो. कला शाखेत पुढे काय करीयर करु शकतो हे फारसे माहित नसल्याने बरेच जण वाणिज्य म्हणजेच कॉमर्सला प्रवेश घेणे पसंत करतात. मात्र कॉमर्सला प्रवेश घेण्यापूर्वी काही किमान गोष्टींची माहिती घ्यायला हवी.

HOT DEALS
  • Apple iPhone SE 32 GB Gold
    ₹ 19959 MRP ₹ 26000 -23%
  • Apple iPhone SE 32 GB Gold
    ₹ 25000 MRP ₹ 26000 -4%

१. तुम्हाला गणित विषय आवडतो का नाही याचा नीट विचार करा. कॉमर्समध्ये अकाऊंटस, कॉस्टींग असे विषय असल्याने त्यामध्ये बऱ्याच प्रमाणात आकडेमोड असते. त्यामुळे आतापर्यंत तुम्हाला गणितामध्ये असलेले गुण आणि आवड दोन्ही लक्षात घ्या.

२. यामध्ये अर्थशास्त्र, कंपनीशी निगडीत कायदे यासंदर्भातील विषय असतात. या विषयात तुम्हाला कितपत आवड आहे हे लक्षात घ्या. अनेकदा हे विषय ऐकायला चांगले वाटू शकतात पण अभ्यासताना हे विषय किचकट वाटू शकतात. त्यामुळे कॉमर्सला असणाऱ्या विषयांबाबत योग्य ती माहिती घेऊन मगच ही शाखा निवडण्याचा विचार करावा.

३. या शाखेत सीए, सीएस, आयसीडब्लूए यांसारख्या बोटावर मोजण्याइतक्याच संधी आपल्याला माहित असतात. पण यासाठी अनेक तास अभ्यास करावा लागतो. तसेच या परीक्षा एका फटक्यात पास होऊ असे नाही. त्यामुळे तासनतास बऱ्याच वर्षांसाठी अभ्यास करण्याची मनाची तयारी आधीपासूनच करणे आवश्यक असते.

४. सध्या कॉमर्सची पदवी घेतलेल्यांसाठी सीए, सीएस या कोर्सेसच्या पलिकडेही अनेक संधी उपलब्ध आहेत. यासाठी लहान व्यावसायिक कोर्सेस उपलब्ध असतात. जे केल्यावर तुम्हाला सहज चांगली नोकरी मिळू शकते. त्यामुळे भविष्यातील संधींबाबत माहिती योग्य ती माहिती घेऊन मगच ही शाखा निवडण्याचे पक्के करावे.

५. बँकींग आणि फायनान्स क्षेत्रात काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही ही शाखा नक्की निवडू शकता. या क्षेत्रात देशातच नव्हे तर परदेशातही अनेक संधी उपलब्ध आहेत. त्यामुळे या मुद्द्याचाही योग्य तो विचार करा आणि कॉमर्सला प्रवेश घ्या.

First Published on June 14, 2018 10:35 am

Web Title: keep this things in mind while taking admission to commerce faculty