News Flash

जाणून घ्या, व्हॉट्सअॅप कॉल कसा करता येईल रेकॉर्ड

आता व्हॉट्सअॅप वापरणे होणार आणखी सोपे

(संग्रहित छायाचित्र)

सध्याच्या जगात आणि जगण्याच्या या वेगात जुळवून घेण्यासाठी प्रत्येकाचेच प्रयत्न सुरु असतात. या प्रयत्नांमध्ये साथ असते ती म्हणजे हातात असणाऱ्या स्मार्टफोनची. हातातल्या स्मार्टफोनच्या वापरामुळे अनेक गोष्टी सुकर झाल्या आहेत. यातही इंटरनेट आणि व्हॉटसअॅपसारख्या अॅप्लिकेशन्समुळे आपले जगणे जास्तच सोपे झाले आहे असे म्हणायला हरकत नाही, व्हॉट्सअपच्या मदतीने तर एकमेकांना पैसे देण्यापासून ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात असणाऱ्या प्रियजनांशी संपर्क साधणंही सोपं झालं आहे. आता यामध्ये आणखी एक भर पडणार आहे. ती म्हणजे, सामान्य कॉलिंग ज्याप्रमाणे रेकॉर्ड करण्याची सुविधा असते त्याचप्रमाणे आता व़्हॉट्सअपच्या माध्यमातून केले जाणारे कॉलही रेकॉर्ड करता येणार आहेत.

व्हॉटसअॅप कॉलिंग हे सध्या सामान्यपणे वापरले जाते. एकमेकांशी गप्पा मारण्यापासून ते महत्त्वाच्या कामांसाठी या सुविधेचा वापर होत होता. पण व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून केलेला कॉल रेकॉर्ड करता येत नसल्याची खंत युजर्सकडून व्यक्त केली जात होती. मात्र आता युजर्सची ही तक्रार लक्षात घेऊन कंपनीने त्यात सुधारणा केली आहे. त्यामुळे आता अवघ्या एका क्लिकवर कॉल रेकॉर्ड करता येणार आहे. ही सुविधा अँड्रॉईड आणि आयफोन अशा दोन्ही सिस्टीमवर उपलब्ध असेल. मात्र हा कॉल रेकॉर्ड करताना तुम्हाला समोरच्या व्यक्तीची परवानगी घ्यावी लागणार आहे. पाहुया हा कॉल कसा रेकॉर्ड करायचा…

मॅक आणि आयफोनच्या माध्यमातून अँड्रॉईड / आयफोनवर कॉल रेकॉर्ड करण्याची पद्धत

– सर्वप्रथम आयफोन लायटिंग केबलच्या साहाय्याने मॅकशी जोडा

– आता आयफोनवर ‘Trust This Computer’ हा पर्याय निवडा. हा पर्याय तेव्हाच विचारला जातो जेव्हा पहिल्यांदाच फोन मॅकला जोडण्यात येतो.

– त्यानंतर मॅकवर ‘QuickTime’ सुरू करा.

– Quick Time मध्ये रेकॉर्ड या बटणाच्या खाली दिसणाऱ्या बाणावर वर क्लिक करत आयफोनचा पर्याय निवडा.

– Quick Time मध्ये रेकॉर्ड बटणावर क्लिक करा.

– आयफोनच्या मदतीने व्हॉट्सअप कॉल करा.

– कॉल कनेक्ट झाल्यानंतर Add User Icon वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला ज्या व्यक्तीशी बोलायचे आहे आणि तिचा कॉल रेकॉर्ड करायचा आहे त्या व्यक्तीचं नाव निवडा.

– बोलणं झाल्यावर फोन डिस्कनेक्ट करा

– आता Quick Time मध्ये जाऊन रेकॉर्डिंग थांबवा आणि ही फाईल मॅकमध्ये सेव्ह करा.

याशिवाय Cube Call Recorder च्या सहाय्यानेही अँड्रॉईड फोनवर व्हॉट्सअॅप कॉल रेकॉर्डिंग करता येते. मात्र ही सुविधा सर्व फोनवर उपलब्ध नसते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 31, 2019 1:20 pm

Web Title: know how to record whatsapp calls on android and iphone
Next Stories
1 बजाज पल्सर NS 160 चा नवा ‘अवतार’
2 Jio phone 2 चा आज पुन्हा फ्लॅश सेल, किंमत 2 हजार 999
3 समारंभासाठी सजताना अशी करा दागिन्यांची निवड
Just Now!
X