News Flash

सौंदर्यभान : चेहऱ्यावरील खड्डय़ांसाठी लेझर उपचार

मुरुम बरा होत असताना ही सूज कमी होते आणि बऱ्याचदा त्या जागी खड्डा तयार होतो.

सौंदर्यभान : चेहऱ्यावरील खड्डय़ांसाठी लेझर उपचार

डॉ. शुभांगी महाजन

मुरुम बरे झाल्यावर होणाऱ्या खड्डय़ांमुळे आज बरेच तरुण-तरुणी पीडित आहेत. या खड्डय़ांमुळे चेहरा विद्रूप दिसतो आणि तरुणांच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. म्हणूनच त्यासाठी उपलब्ध असलेल्या विविध उपचारांबद्दल जाणून घेण्याची सर्वानाच उत्सुकता असते. मागील सत्रात आपण डर्मारोलर उपचारपद्धतीबद्दल माहिती घेतली. तसेच लेझर उपचार पद्धती या खड्डय़ांसाठी किती उपयुक्त ठरते ते जाणून घेऊ या. पण त्याआधी मुरुम बरे होताना खड्डे का तयार होतात ते बघू या. जेव्हा त्वचेतील सिबॅसिअस ग्रंथीला सूज येते, तेव्हा त्याजागी त्वचेवर कोड तयार होतात. त्यालाच मुरुम असे म्हणतात. मुरुम बरा होत असताना ही सूज कमी होते आणि बऱ्याचदा त्या जागी खड्डा तयार होतो.

मुरुमाच्या खड्डय़ांचे प्रकार

खड्डय़ांच्या आकारावरून आणि त्यांच्या त्वचेतील खोलीवरून त्यांचे प्रकार ठरतात. हे खड्डे तीन प्रकारचे असतात.

* आईस पिक स्कार

* रोलिंग स्कार

* बॉक्सकार स्कार

खड्डय़ांसाठी कोणते लेझर वापरतात?

कोणते लेझर वापरायचे हे खड्डय़ांच्या प्रकारावर अवलंबून असते. यासाठी अरबियन ग्लास लेझर, इंटेन्स पल्स लाइट लेझर, एनडी- याग लेझर असे विविध प्रकारचे लेझर वापरता येतात. या लेझरच्या विविध गुणधर्मानुसार त्याचा उपयोग केला जातो. खड्डे त्वचेत अतिशय बरेच वर फारच कमी प्रमाणात असतात, तेव्हा अरबियन ग्लास लेझर उपयुक्त ठरतो. खड्डे खोलवर आणि पसरलेले असतात, तेव्हा फ्रॅक्शनल सीओ टू लेझर वापरतात.

लेझर कसे कार्य करते?

लेझर उपकरणाच्या प्रोबमधून डोळय़ांना न दिसणारे हजारो लेझर किरण त्वचेमध्ये जातात आणि त्यामुळे त्वचा आकुंचन पावते आणि खड्डे फ्लॅट किंवा पसरट होण्यास मदत होते. लेझरमुळे होणारा परिणाम कायमस्वरूपी असतो. मात्र खड्डे संपूर्णत: घालवता येत नाहीत. जवळजवळ ७०-८० टक्के सुधारणा दिसून येते.

इच्छित सुधारणेसाठी किती कालावधी लागतो?

चेहऱ्यावरील खड्डय़ांमध्ये इच्छित सुधारणा दिसून येण्यासाठी लेझरचे कमीत कमी पाच ते सहा सेशन्स घेणे गरजेचे आहे. दोन ते तीन सेशन्सनंतर सुधारणा दिसण्यास सुरुवात होते. दोन सेशन्सच्या मध्ये किमान एक ते दोन महिन्यांचे अंतर ठेवणे गरजेचे आहे.

दुष्परिणाम

*  लेझर योग्य पद्धतीने न वापरल्यास त्या जागी त्वचा जळून काळी पडू शकते.

*  लेझर ट्रीटमेंट झाल्यावर लगेचच त्या जागी थोडा लालसरपणा येतो आणि हलकी जळजळ होते.

*  भारतीय वंशाच्या लोकांच्या त्वचेला काळे डाग पडण्याची संभावना अधिक असते.

*  लेझर ट्रीटमेंटनंतर उन्हापासून त्वचेचे संरक्षण न केल्यास त्वचा जळून काळी पडू शकते.

उपचारादरम्यान आणि नंतर घ्यावयाची काळजी

*  उपचार घेण्यापूर्वी त्वचा व्यवस्थित मॉश्च्युराईझ्ड असावी. कोश्ठी किंवा उन्हामुळे लाल झालेली नसावी.

*  लेझर उपचार घेतल्यानंतर लगेचच त्वचेला बर्फ लावून थंड करून घ्यावे. आणि त्यावर डॉक्टरांनी दिलेले क्रीम्स लावावे.

*  लेझर उपचारानंतर सात ते दहा दिवस त्वचेचे संरक्षण करावे. त्यासाठी घराबाहेर पडताना योग्य प्रमाणात सनस्क्रीन लावावे किंवा स्कार्फ बांधावा.

*  लेझर उपचार प्रशिक्षित सौंदर्यतज्ज्ञांकडूनच किंवा त्वचारोगतज्ज्ञांकडूनच करावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 4, 2020 12:01 am

Web Title: laser treatment for the removal of acne scars zws 70
Next Stories
1 आयुर्उपचार : बस्ति
2 दिवाळीत घरीच तयार करा श्रीखंडासाठी लागणारा चक्का; जाणून घ्या कृती
3 चकलीची भाजणी चुकते ? मग ही पद्धत वापरुन पाहा
Just Now!
X