29 September 2020

News Flash

महिंद्राची ‘Jawa Motorcycles’ १५ तारखेला लाँच, पाहा व्हिडीओ

अत्यंत प्रतिष्ठेची व भारतात एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेली मोटरसायकल दाखल करण्यास सज्ज झाली आहे.

महिंद्रा अँड महिंद्राच्या मालकिची क्लासिक लीजंड्स ही कंपनी जावा ही अत्यंत प्रतिष्ठेची व भारतात एकेकाळी प्रचंड लोकप्रिय असलेली मोटरसायकल दाखल करण्यास सज्ज झाली आहे. भारतामध्ये Jawa Motorcycles आकर्षणाचा विषय राहिला आहे. महिंद्राने २०१६ मध्ये या कंपनीला खरेदी केल्यानंतर पुन्हा एकदा jewa ३०० ला पुन्हा एखदा भारतामध्ये लाँच करण्याची घोषणा केली आहे. Jawa Motorcycles ला महिंद्रा अँड महिंद्रा १५ तारखेला लाँच करणार आहे. या बाईकची किंमत अद्याप समोर आलेली नाही. मात्र, तज्ञांच्या अंदाजानुसार या बाईकची किंमत दोन लाखांच्या आसपास असू शकते.  Jawa Motorcycles चा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट करण्यात आला आहे. त्यामुळे सध्या हा चर्चेचा विषय आहे.

जावा मोटरसायकल या मूळच्या झेक कंपनीचं पहिलं मॉडेल 1929 साली जन्माला आलं जे 499 सीसीचं होतं. भारतीय बाजारपेठेच्या गरजेनुसार व सध्याचा तरूणाईचा कल बघून महिंद्रा नवीन जावा बाजारात आणणार आहेत. इटलीमधल्या वरेसी इथल्या तांत्रिक केंद्रामध्ये जगातील आघाडीच्या इंजिन तज्ज्ञांबरोबर काम केल्यानंतर नवीन जावा तयार करण्यात आल्याचं कंपनीनं म्हटलं आहे. या बाईकचं वैशिष्ट्य सांगताना आयुष्यभर साथ देईल असं नमूद करण्यात आलं आहे. इंजिनच्या एगझॉट यंत्रणेवर विशेष मेहनत घेण्यात आली असून योग्य त्या पाईपांची निवड करण्यात आली आहे, ज्यामुळे हवा तो परिणाम साधला गेल्याचा दावा करण्यात आला आहे.

 Jawa Motorcycles  स्पेसिफिकेशन्स
सहा गियरबॉक्स
इंजन 293सीसी
लिक्विड कूल्ड सिंगल सिलिंडर
डीओएचसी (डुअल ओवरहेड कॅमशाफ्ट)
गोल हेडलाइट
डिसपर्शन स्टाइलमध्ये लेन्
डुअल डिस्क ब्रेक

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 13, 2018 4:59 pm

Web Title: mahindra is going to launch new jawa motorcycle on november 15
Next Stories
1 Vivo Z1 Lite लाँच; जाणून घ्या फिचर्स, स्पेसिफिकेशन्स आणि किंमत
2 हिवाळ्यात हे पदार्थ जरूर खा
3 पोस्टात दररोज भरा ५५ रूपये अन् मिळवा १० लाख रुपयांचा विमा
Just Now!
X