कधी एकदा शुक्रवार येतो याची सगळेच जण आतुरतेने वाट पाहत असतात. शुक्रवारनंतर विकेंड असल्याने हा ऑफीसला जाणाऱ्यांसाठी काहीसा कॅज्युअल दिवस असतो. बहुतांश ठिकाणी या दिवशी ऑफिसला कॅज्युअल वेअर चालतात. त्यामुळे यावेळी काय घालायचे असा प्रश्न सर्वांसमोर पडतो. मग त्यावेळी रोजच्या कपड्यांपेक्षा वेगळे काहीतरी आणि तरीही कंपनीच्या नियमांचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेणे महत्त्वाचे ठरते. यासाठीच स्पायकरचे डिझाइन हेड अभिषेक यादव यांनी काही टीप्स दिल्या आहेत.

आरामदायी असणं महत्वाचं: कॅज्युअल खाकी स्ट्रेच पॅन्ट मध्ये आरामदायी वाटू शकते. एकतर क्रॉस पॉकेट किंवा जीन्सला पाच पॉकेट्स असतील. तुम्ही त्यावर आरामदायक शर्ट घालू शकता. हलक्या डेनिम शर्टमध्ये खाकी पॅंटसोबत नेहमी चांगला दिसतो, आणि हा फॅशन ट्रेंड कायमस्वरूपी राहणार आहे. उत्कृष्ट प्रतीचे क्लासिक स्नीकर्स आणि सर्व प्रकारचे प्रिंटेड पोलो किंवा स्मार्ट कॅज्युअल शर्ट हा लुक पूर्ण करेल.

निळा रंग निवडा: निळ्या रंगाची डेनिम अधिक छान दिसते आणि कामाच्या ठिकाणी स्मार्टपणे तिला कॅरी करता येते. ही डेनिम त्रासदायी नसेल याची काळजी घ्या. ती तुम्ही सौम्य रंगाच्या क्लासिक शर्टसह घालू शकता. वेस्टर्न यॉर्क आणि २ पॉकेट एकत्र असलेले शर्टही चांगला कॅज्युअल लुक देऊ शकतात.

रंग तटस्थ असू द्या : कॅज्युअल दिसण्यासाठी पोत आणि रंग एकत्र मिसळण्याचा प्रयत्न करू नका. असे केल्याने आपली स्टाईल खराब होऊ शकते आणि स्मार्ट-अनौपचारिक दिसण्यापेक्षा ते अधिक कॅज्युअल होऊ शकते. उन्हाळ्यामध्ये जेंव्हा रंगाचा विचार होतो तेंव्हा तटस्थ किंवा पेस्टल शेड जास्त चांगली दिसते. पेस्टल शर्ट किंवा पोलो टी-शर्ट काही पॅटर्न किंवा प्रिंट निळ्या जीन्स आणि खाकी पॅंटसह चांगले दिसतात.

ब्लॅक आणि बोल्ड: काळ्या रंगाला बदली दुसरा रंग नाही ज्याप्रमाणे काळा रंग बिझिनेस ड्रेसिंग म्हणून ओळखला जातो तसाच तो कॅज्युअल म्हणूनही चांगला वाटतो. ब्लॅक जीन्स घातल्यास त्यावर कोणत्याही प्रकारचे टीशर्ट किंवा हाफ शर्ट चांगले दिसतात.

स्वतःचे अस्तित्व जपा: अधिक मेहनत करुन फॅनश केलीत तर तुम्ही गर्दीत विचित्र दिसू शकता, जे हाताळण्यास थोडेसे त्रासदायक असू शकते. आपल्याला चांगले आणि आरामदायी वाटत असलेल्या कपड्यांचा प्रयत्न करणे सर्वोत्तम आहे. स्पायकर ब्लू जीन्सची आपल्या आवडत्या जोडीला स्लिम फिटमध्ये पसंतीची निवड असू शकते. आणि यावर आपण चेक्स किंवा रंगीत पोलो टी-शर्टसह वापरू शकता.