भारताच्या ऑटोमोबाइल बाजारात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी दिवसेंदिवस वाढतेय. नवनवीन कंपन्या भारतात पदार्पण करतायेत. इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रातील दिग्गज कंपनी टेस्लानेही भारतात पदार्पण करणार असल्याचं काही दिवसांपूर्वीच जाहीर केलंय. काही महिन्यांपूर्वी लाँच झालेल्या टाटा नेक्सॉन इलेक्ट्रिकलाही भारतात चांगला प्रतिसाद मिळालाय. याशिवाय Hyundai Kona आणि MG ZS EV देखील भारतात लाँच झाल्यात. आता मारुती, ह्युंडाई, टाटा मोटर्स यांसारख्या प्रमुख कंपन्या बाजारात नवीन मॉडेल्स आणण्याच्या तयारीत आहेत. अशात मारुतीच्या चाहत्यांसाठी एक बॅड न्यूज आलीये.

(जबरदस्त ! 2021 मधील ‘ढासू’ SUV, टोयोटाने लाँच केली बहुप्रतिक्षित Fortuner Facelift आणि Legender)

गेल्या अनेक दिवसांपासून मारुती सुझुकी आपली लोकप्रिय कार WagonR इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लवकरच लाँच करणार अशी चर्चा रंगली होती. २०२० मध्ये ही कार लाँच होईल असं सांगितलं जात होतं, पण तसं घडलं नाही. करोनामुळे कार लाँचिंगची योजना कंपनीने पुढे ढकलल्याची चर्चा होती, पण अशातच आता कंपनीने ही कार इलेक्ट्रिक व्हर्जनमध्ये लाँच करण्याची योजना रद्द केल्याचं वृत्त आलं आहे. इकॉनॉमिक टाइम्सने याबाबतचं वृत्त दिलंय. तांत्रिक-व्यावसायिक व्यवहार्यतेच्या समस्यांमुळे (techno-commercial viability issues) हा निर्णय घेतल्याचं या वृत्तात म्हटलंय. दरम्यान, अद्याप मारुतीने याबाबतची अधिकृत माहिती दिलेली नाहीये. मारुतीची ही कार भारतात चांगलील लोकप्रिय आहे, त्यामुळे हे वृत्त इलेक्ट्रिक वॅगनआरची वाट बघणाऱ्यांसाठी नक्कीच निराशाजनक आहे.

(स्वस्त झाली Ford ची सर्वात लोकप्रिय SUV, कंपनीकडून किंमतीत घसघशीत कपात)

अन्य गाड्यांच्या लाँचिंगलाही होणार उशीर :-
करोना व्हायरस महामारीचा फटका बसल्याने कार कंपन्यांना पार्ट्स सप्लायमध्ये समस्यांचा सामना करावा लागतोय. त्यामुळे 2023 पर्यंत लाँच होणाऱ्या अनेक कार 3 से 6 महिने उशीर लाँच होतील. यामध्ये Tata HBX EV चाही समावेश आहे.