शरीरातील लसिका रक्तपेशी (लिंफोसाइट) कमी झाल्या तर ती आगामी काळातील आजाराची धोक्याची सूचना असते असे एका डॅनिश संशोधनात दिसून आले आहे. त्यांच्या मते लसिका पेशींची संख्यापातळी कमी झाली तर कुठल्याही रोगाने मृत्यू ओढवण्याची जोखीम साठ टक्क्य़ांनी वाढते.

लिंफोपेनिया या अवस्थेत लसिका रक्तपेशी कमी होतात. अनेकदा रक्तचाचण्यातून ही गोष्ट समजत असतानाही त्याक डे होणारे दुर्लक्ष हे घातक ठरते. त्यासाठी रुग्णांना पुढील सल्ला घेण्याची सूचना दिली जात नाही. त्यामुळे पुढील आजारांची धोक्याची घंटाही समजत नाही. डेन्मार्कमधील कोपनहेगन युनिव्हर्सिटी रुग्णालयातील स्टिग बोजनसन यांनी म्हटले आहे, की लिंफोपेनिया आजाराच्या संशोधनात काही रुग्ण सहभागी झाले होते. पण, त्यांच्यातील जोखीम जास्त दिसून आली. वयपरत्वे होणाऱ्या आजारांसह सर्वच बाबतीत या रुग्णांचा धोका वाढलेला असतो. कॅनेडियन मेडिकल असोसिएशनच्या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या या संशोधनात डॅनिश वंशाच्या २० ते १०० वयोगटातील १०८१३५ व्यक्तींचा अभ्यास करण्यात आला. या पाहणीतून संशोधकांनी हा निष्कर्ष काढला आहे.

Guru Asta 2024
३ मे पासून हिऱ्यापेक्षाही जास्त चमकणार ‘या’ राशींचे नशीब? देवगुरु अस्त होताच उत्पन्नात होऊ शकते मोठी वाढ
What are the reasons for increase in average life expectancy of Indians
भारतीयांचे सरासरी आयुर्मान वाढतेय… कारणे कोणती?
Blood Pressure drug
रक्तदाबाची औषधे मधेच बंद केल्याने तुम्हाला अधिक नुकसान होऊ शकते? काय सांगतात डाॅक्टर… 
पाणी किंवा चहात फक्त १५ मिली ‘हे’ द्रव घातल्यास कंबरेचा घेर व वजन होईल कमी; नवीन अभ्यास काय सांगतो?

२००३ ते २०१५ या काळात कोपनहेगन लोकसंख्या अभ्यासाअंतर्गत त्यांची नोंदणी करण्यात आली होती. कुठल्याही कारणाने होणाऱ्या मृत्यूची जोखीम लसिका पेशी कमी झाल्याने १.६ पट वाढते. कर्करोग, हृदयरोग, श्वसनरोग, संसर्ग यामुळे मरण्याची जोखीम २.८ पट वाढते. या काळात एकूण १०३७२ जण मरण पावले. वय वाढते तशी लसिका पेशींची संख्या कमी होते. त्यामुळे माणूस अशक्त बनत जातो. त्यामुळे यापुढे डॉक्टरांनी रक्त तपासणीचे अहवाल बघताना लसिका पेशींच्या संख्येवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचंही या संशोधनात म्हटलं आहे.