ख्यातनाम कार निर्माती कंपनी ‘मर्सिडिज-बेन्झ’ने भारतात त्यांची पहिली-वहिली बीएस-6 तंत्रज्ञानावर आधारित ई-क्लास लाँग व्हीलबेस लक्झरी बिझनेस सेदान लाँच केली आहे. 10वी जनरेशन असणारी नवी E-क्लास म्हणजे सर्वंकष लक्झरी बिझनेस सेदान असून यामध्ये ड्रायव्हिंगविषयक कामगिरी आणि आरामदायीपणा व आलीशानपणा यांची योग्य सांगड घालण्यात आली आहे. मर्सिडिज–बेन्झ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी मार्टिन श्वेंक यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं.

नव्या लाँग व्हीलबेस Eक्लासमध्ये दोन अद्ययावत BS6 कम्प्लायंट पेट्रोल व डिझेल इंजिन आहेत, शिवाय अंतर्भागात नवे बदल केले आहेत व नवी वैशिष्ट्ये समाविष्ट केली आहेत. यामध्ये, रिअर टचपॅड, बर्मेस्टर हायएंड सराउंड साउंड सिस्टीम, वाइडसक्रीन डिजिटल कॉकपिट (12.3 इंच) व रिअर वायरलेस चार्जर यांचा समावेश आहे. लक्झरी वाहन क्षेत्रात प्रथमच अशा प्रकारचा रिअर टचपॅडचा पर्याय मर्सिडिजने उपलब्ध करून दिला आहे. वाइडस्क्रीन डिजिटल कॉकपिट या फीचरमध्ये इन्स्ट्रुमेंट डिस्प्लेसाठी १२.३ इंचाचा आकर्षक डिस्प्ले देण्यात आला असून, यात विविध मोडही उपलब्ध आहेत. बर्मेस्टर हाय-एंड सराउंड साउंड सिस्टीममध्ये १३ स्पीकरचा समावेश असल्यामुळे पुढच्या व मागच्या सीटवर बसलेल्या प्रवाशांना संगीताचा चांगला अनुभव घेता येईल. तर रिअर वायरलेस या फीचरद्वारे वायरलेस चार्जिंगची सोय करण्यात आली आहे. पाठच्या सीटवर बसूनही सोयीस्करपणे व केबलविना मोबाइल चार्ज करण्याची सुविधा आहे. मर्सिडिज-बेन्झ ई 220 डी’ या गाडीत 1950 सीसी इन-लाइन 4 डिझेल इंजिन असून, अवघ्या 7.3 सेकंदांत ही गाडी 100 किमी प्रति तासाचा वेग गाठू शकते. चार प्रकारात उपलब्ध असणाऱ्या या गाडीची एक्स शो-रूम किंमत 58.5 लाख ते 62.5 लाखादरम्यान आहे.

‘मर्सिडिज-बेन्झ इंडियाने जानेवारी 2018 मध्ये भारतातील पहिली ‘मेड इन इंडिया, फॉर इंडिया’ BS 6 वाहन दाखल केले. तेव्हापासून, आम्ही सातत्याने BS 6 मध्ये परिवर्तन करत आहोत आणि BS 6 लाँग व्हीलबेस E-क्लास सादर करण्यातून आमची एप्रिल 2020 पासून नव्या एमिशन नियमांबद्दलची बांधिलकी अधोरेखित होणार आहे. ड्रायव्हिंगच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी अपेक्षित असणाऱ्या ग्राहकांची अपेक्षा नवा BS 6 E-क्लास हा प्रकार पूर्ण करणार आहे, तसेच सर्वात ऐसपैस रिअर केबिनचा अनुभवही देणार आहे. ड्रायव्हिंगच्या बाबतीत उत्कृष्ट कामगिरी अपेक्षित असणाऱ्या ग्राहकांची अपेक्षा नवा BS 6 E-क्लास हा प्रकार पूर्ण करणार आहे, तसेच सर्वात ऐसपैस रिअर केबिनचा अनुभवही देणार आहे. शोफर-ड्रिव्हन गाडीला पसंती देणाऱ्यांसाठी अद्वितीय लक्झरी अनुभव मिळणार आहे. नवी लाँग व्हीलबेस BS6E-क्लास आपली यशोगाथा कायम राखेल व मर्सिडिज-बेन्झच्या भारतातील वाढीला चालना देत राहील,याची खात्री आहे. दोन दशकांहून जुना इतिहास व भारतात 41,000 हून अधिक युनिट अशी परंपरा असणारा नवा E-क्लास हा आमच्या उत्पादनांचा एक प्रमुख स्तंभ आहे. लाँग व्हीलबेस E-क्लास ही अतिशय लोकप्रिय बिझनेस सेदान आहे आणि तिने स्वतःचे विशेष स्थान निर्माण केले आहे. या वर्षासाठीच्या आमच्या ‘बेस्ट नेव्हर रेस्ट’ या उद्दिष्टानुसार, आम्ही दोन नवीन BS 6 इंजिन आणि चोखंदळ ग्राहकांसाठी अनेक वैशिष्ट्यपूर्ण बदल दाखल करून या ‘मास्टरपिस ऑफ इंटलिजन्स’चे महत्त्व आणखी वाढवणार आहे’, अशी प्रतिक्रिया मार्टिन श्वेंक यांनी दिली.