News Flash

फक्त एक रूपयात खरेदी करा Redmi Note 7 Pro

दरवर्षी प्रमाणे शाओमीने यंदाही भारतात 'एम आय फॅन फेस्टीवल'चं आयोजन केलं आहे

दरवर्षी प्रमाणे शाओमीने यंदाही भारतात ‘एम आय फॅन फेस्टीवल’चं आयोजन केलं आहे. ४ एप्रिल ते ६ एप्रिल दरम्यान हा फेस्टीवल असणार आहे. या सेलमध्ये अनेक आकर्षक ऑफर्सचा समावेश असेल. यामध्ये ग्राहकांना प्रसिद्ध स्मार्टफोन आणि टीव्हीवर मोठी सुट मिळणार आहे. विशेष म्हणजे ग्राहकांना Redmi Note 7 Pro, Poco F1, Mi Soundbar आणि Mi LED TV 4A सारखे प्रॉडक्ट एक रूपयात खरेदी करता येणार आहेत.

एक रूपयांत स्मार्टफोन खरेदीचा प्लॅशसेल ४ एप्रिल ते ६ एप्रिल दरम्यान दररोज सकाळी १० ते दुपारी दोन वाजेपर्यंत असणार आहे. याशिवाय कंपनीने मिस्ट्री बॉक्स सेलचेही आयोजन केले आहे. यात ग्राहकांना सरप्राइज बॉक्स खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. यामध्ये ९९ रूपयांपासून २, ४०० रूपयांपर्यंतची उत्पादने मिळणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या सेलमध्ये कंपनी आपल्या ग्राहकांना फन अॅण्ड फ्यूरियस गेम खेळण्याची संधी देणार आहे. ज्यात ग्राहकांना पोको एफ १ आणि रेडमी नोट ७ सह इतर उत्पादने मोफत मिळणार आहेत. शाओमीच्या फॅन सेलदरम्यान HDFC बँकेच्या कार्डने खरेदी करणाऱ्या ग्राहकांना पाच टक्केंचा इस्टेंट डिस्काउंट (५०० रूपये पर्यंत) मिळणार आहे.

कोणत्या प्रॉडक्टवर किती डिस्काउंट –
– शाओमी रेडमी 6 (3GB+32GB) 2000 रुपयांच्या डिस्काउंटसह ६९९९ रूपयांत मिळणार आहे.

– शाओमी रेडमी Y2 (3GB +32GB) आणि (4GB+64GB) वर 2,500 रुपयांचा डिस्काउंट दिला जाणार आहे. Y2 (3GB +32GB) ७९९९ रूपयांना तर Y2 (4GB+64GB) ९९९९ रूपयांना मिळणार आहे.

– 3,500 रुपयांच्या डिस्काउंटसह शाओमी रेडमी 6 प्रो (3GB+32GB) आणि (4GB+64GB) वेरियंट 7,999 आणि 9,999, रुपयांना मिळणार आहेत.

– 5,000 रुपयांच्या डिस्काउंटसोबत शाओमी रेडमी Note 5 प्रो (4GB+64GB) 10,999 रुपयांत मिळेल.
– Xiaomi Poco F1 वर 4,000 ची सूटसह 20,999 रुपयांना खरेदी करता येणार आहे.

– Mi LED TV 4 प्रो (55-inch) 9,000 रुपयांच्या डिस्काउंटनंतर 45,999 रुपयांत मिळेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 1, 2019 6:44 pm

Web Title: mi fan festival 201 xiaomi to sell redmi note 7 pro for rs1
Next Stories
1 उन्हाळ्यात नेमके खायचे तरी काय?
2 मूळव्याध: समज, गैरसमज, लक्षणे आणि उपचार
3 April Fools Day: वर्षभर ‘(एप्रिल) फूल’ बनवणारे ‘प्रँक्स कल्चर’
Just Now!
X