भारतीय स्मार्टफोन कंपनी मायक्रोमॅक्सने नोव्हेंबरच्या सुरूवातीलाच आपली नवीन micromax in series लाँच केली होती. त्यावेळी कंपनीने दोन डिव्हाइस Micromax In Note 1 आणि Micromax In 1B लॉन्च केले होते. त्यातील Micromax In Note 1 या फोनसाठी आज पहिल्यांदाच फ्लॅश-सेल आयोजित करण्यात आला होता. पहिल्या सेलमध्ये या फोनला ग्राहकांचा तुफान प्रतिसाद मिळालाय. Micromax In Note 1 चा सेल सुरू होताच अवघ्या काही मिनिटांतच हा फोन सोल्ड आउट झाला आहे.

Micromax In Note 1 हा फोन सोल्ड आउट झाल्याची माहिती कंपनीने ट्विटरद्वारे दिली आहे. यासोबतच कंपनीने पुढील सेलबाबतही माहिती दिली आहे. 1 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजेपासून हा फोन पुन्हा एकदा फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर फ्लॅश सेलमध्ये उपलब्ध असेल.

किंमत आणि स्पेसिफिकेशन्स :-
Micromax In Note 1 फोनच्या 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. तर 4 जीबी रॅम प्लस 128 जीबी स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 12 हजार 499 रुपये आहे. हा फोन व्हाइट आणि ग्रीन अशा दोन कलरच्या पर्यायात उपलब्ध आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचाचा फुल HD+ डिस्प्ले असून हा फोन अंड्रॉइड 10 वर कार्यरत असेल. डिस्प्लेची डिझाइन पंचहोल असून त्यात सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. याशिवाय फोनमध्ये मीडियाटेक हीलियोG85 प्रोसेसर, 4GB रॅम आणि 64/128 जीबी स्टोरेज आहे. फोनमध्ये चार रिअर कॅमेरे आहेत. त्यातील ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. तर, 5 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड, 2 मेगापिक्सलचा मायक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे. 16 मेगापिक्सलचा फ्रंट सेल्फी कॅमेराही. याशिवाय फोनमध्ये 5000mAh क्षमतेची दमदार बॅटरीही दिली आहे.