जी मुले कमी चरबी (फॅट) असलेले अथवा स्किम्ड दूध घेतात, त्यांच्या तुलनेत जी तरुण मुले जास्त चरबीयुक्त असलेले दूध घेतात ती मुले अधिक सडपातळ आणि जीवनसत्त्व ‘ड’ने समृद्ध असतात, असे एका संशोधनात दिसून आले आहे.

एक किंवा दोन टक्के चरबी असलेले दूध घेणाऱ्या मुलांच्या तुलनेत जी मुले ३.२५ टक्के चरबीचे प्रमाण असलेले दूध घेतात त्यांचा बॉडी मास इंडेक्स (बीएमआय) ०.७२ युनिट असतो. संतुलित वजन आणि जास्त वजन यासाठी तुलनात्मक अभ्यास करण्यात आला असल्याचे कॅनडातील सेंट मायकेल रुग्णालयाचे बालरोगतज्ज्ञ आणि लेखक जोनाथॉन मागुइरे यांनी म्हटले आहे.

Obesity kid
सिडेंटरी लाईफस्टाईल, आऊटिंग, टेस्ट बड्स, स्क्रीन टाईममुळे मुलांचा स्थुलपणा वाढतो? पण म्हणजे काय?
forever particles marathi news, forever particles latest marathi news
विश्लेषण : जगभर पिण्याच्या पाण्यात आढळतात घातक `फॉरएव्हर पार्टिकल्सʼ… त्यांचे उच्चाटन अवघड का असते?
chocolate expensive, decline in cocoa production,
विश्लेषण: जगभरात चॉकोलेट का महागली? कोको उत्पादनात घट झाल्याचा परिणाम?
In redevelopment of flat holders Redevelopment Senior
पुनर्विकासातील ज्येष्ठ!

जास्त चरबी असलेले दूध घेणारी मुले आणि त्याच प्रमाणात कमी चरबी असणारे दूध घेणारी मुले यांचा अभ्यास करून त्यांनी हे गृहीतक मांडले आहे. जर मुले दूध पीत नसतील तर त्यांना निरोगी राहण्यासाठी आणि अधिक कॅलरी मिळविण्यासाठी इतर अन्नपदार्थ जास्त खावे लागतील, असे त्यांनी म्हटले आहे.

जी मुले चरबीयुक्त दुधाचा एक कप दररोज घेत असतात त्यांच्यामध्ये जीवनसत्त्व ‘ड’चे प्रमाण मोठय़ा प्रमाणात वाढते. फॅटयुक्त दुधामध्ये जीवनसत्त्व ‘ड’चे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर असते. जी मुले कमी चरबीयुक्त असलेले दूध घेतात त्यांना जीवनसत्त्व ‘ड’ पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याचे अभ्यासात दिसून आले आहे. संशोधकांनी दोन ते सहा वर्षे वयोगटातील २,७४५ मुलांचा अभ्यास करून हे संशोधन केले आहे. हे संशोधन अमेरिकेच्या वैद्यकीय पोषण नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)