नव्या तंत्रज्ञानाच्या युगात ‘पासवर्ड’ या संकल्पनेला प्रचंड महत्त्व आलेले आहे. ई-मेल, बँक खात्यांच्या तसेच अन्य ऑनलाइन व्यवहारांसाठी पासवर्ड लागतोच. पासवर्ड गुप्त स्वरूपाचा असावा आणि ‌तो प्रत्येकाने स्वतःच्या आवडीनुसार ठेवावा, असे म्हटले जाते. त्यानुसार अनेकांना आपण एकदम ‘युनिक’ पासवर्ड ठेवला आहे, असे वाटत असते. प्रत्यक्षात पासवर्डमध्ये अनेक शब्द, आकडे एकसारखेच असतात, असे दिसून येते. यामुळे अकाउंट हॅक होण्याचा धोका वाढतो. नॅशनल सायबर सिक्युरिटी सेंटरने असेच सर्वाधिक वापरले जाणारे पासवर्ड प्रसिद्ध केले आहेत. नॅशनल सायबर सिक्युरिटीच्या अहवालानुसार जगभरात वापरले जाणाऱ्या दहा कॉमन पासवर्डची यादी जाहीर करण्यात आली आहे.

यामध्ये १२३४५६ हा पासवर्ड जगात सर्वाधिक वापरला जातो. तर त्यानंर १२३४५६७८९ हा पासवर्ड अनेकांचा आहे. सिक्युरिटी रिसर्चर्स सतत पासवर्डबाबत इशारा देत असतात. तरीही सुद्धा जगभरात लाखो लोक त्यांच्या ई-मेल, स्मार्टफोन, लॅपटॉप, कम्प्युटर आणि दुसऱ्या डिव्हायसेसना सुरक्षित करण्यासाठी कमजोर आणि सहजपणे लक्षात येणारे पासवर्ड ठेवतात.

सायबर सिक्युरिटी संस्थेने सूचना केली आहे की, यूजरने वेगवेगळ्या लॉग-इनसाठी वेगवेगळा पासवर्डचा वापर करावा. अशात हॅकर्स तुमचं अकाऊंट हॅक करणं कठीण होतं.

उपाय काय? –
अधिक चांगला, स्ट्रॉंग पासवर्ड निवडणं हाच ऑनलाइन सुरक्षेसाठी एकमेव उपाय आहे.

सर्वाधिक वापरले जाणारे १० पासवर्ड –
123456
123456789
qwerty
password
111111
2345678
abc123
1234567
password1
12345