‘शतावरी’ ही एक उत्‍तम औषधी वनस्‍पती असून ती काटेरी झुपकेदार वेल स्‍वरूपात असते. कडू-गोड चवीची, शीतवीर्य असलेल्या शतावरीची मुळे व पाने औषध म्‍हणून वापरली जातात. शतावरीचा उपयोग स्‍त्रीयांच्‍या लैगिंग इच्‍छाशक्तित वाढ होणे, बाळंतपणातील अशक्‍तपणा दूर करण्यासाठी, दूध वृध्‍दीसाठी व प्रजोत्‍पादनासाठी होतो. शतावरी म्‍हणजे ‘शत-आवरी’ म्‍हणजेच ‘१०० नर ताब्‍यात असलेली नार’ असा होतो. शतावरीच्‍या मुळया दूधात वाटून लावल्‍यास स्‍तन वृध्‍दीसाठी त्‍याचा उपयोग होतो.
शतावरीच्‍या कंदामध्‍ये सँपोनीन, ग्‍लायकोसाईडस, फॉस्‍फरस, रायबोफलेवीन, थायमीन, पोटँशियम, व इतरही रासायनिक द्रव्‍ये आहेत. शतावरीमध्‍ये व्हिटॅमिन –ए, व्हिटॅमिन-सी, व्हिटॅमिन-बी-कॉम्‍पलेक्‍स जास्‍त प्रमाणात आढळतात. कँसर, क्षयरोग, कुष्‍ठरोग, आम्‍लपित्‍त, एडस इत्‍यादी आजारांवर उपचार करण्‍यासाठी शतावरी उपयोगात आणतात. कॅन्‍सरच्‍या रूग्‍णांना तर शतावरी वरदानरूप ठरली आहे.
ही कडू-गोड चवीची, काटेरी झुपकेदार आरोहिणी वेल, म्हणजेच औषधी वनस्पती मुख्यत: आम्लपित्त दोषासाठी वापरली जाते. शतावरीचा अजून उपयोग पोटाचा अल्सर, ज्वर, शरिरपुष्टता, वात, पित्त, जुलाब यासाठीतर होतोच, शिवाय ब्रॉन्कायटिस, मुदतीचा ताप आणि मुख्य म्हणजे शरिरातील द्रव्याचा समतोल राखण्यासाठीही होतो. अशा त-हेने अनेक व्याधींसाठी उपकारक असलेल्या शतावरीस ’वनस्पतींची राणी’ संबोधणे चुकीचे ठरणार नाही.

marathi play savita damodar paranjape
‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!
Keri Rings Pakoda Crispy raw mango pakoda kairi bhaji
गरमा गरम कुरकुरीत कैरीची भजी, एकादा खाल तर खातच राहाल! पाहा हटके रेसिपी Video
Gavran Mushich Kalvan Recipe In Marathi
मटणासारखं गावरान पद्धतीचं मुशी मच्छीचं झणझणीत कालवण; ही घ्या सोपी रेसिपी
What Is Sugar Made Of Milk Honey Table Sugar
साखर हे पांढरं विष? दूध, मध, साध्या साखरेत नेमकं असतं काय? १० दिवस साखर खाल्ली नाही तर कसं बदलेल शरीर?