25 January 2020

News Flash

कायमस्वरूपी पदांसाठी मुंबई मेट्रोमध्ये बंपर भरती

१६ सप्टेंबर ते सहा ऑक्टोबरदरम्यान अर्ज करू शकता

Mumbai Metro Recruitment 2019, Mumbai Metro Bharti : मुंबई मेट्रोमध्ये एक हजार ५३ पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. ही नोकरी कायस्वरुपी स्वरुपाची असणार आहे. वेगवेगळ्या पदांसाठी ही भरती निघाली आहे.

इच्छूक उमेद्वारांनी नोकरीसाठी इच्छूक असणाऱ्या तरुणांनी www.mmrda.maharashtra.gov.in या वेबसाईटवर अर्ज भरायचा आहे. १६ सप्टेंबर ते सहा ऑक्टोबरदरम्यान अर्ज करू शकता. अर्ज भरण्यासाठी खुल्यावर्गातील उमेदवारांना ३०० रुपये तर राखीव उमेदवारांसाठी १५० रुपये परिक्षा फी आहे. याशिवाय निवड झालेल्या उमेदवारांना त्यांच्या पदाप्रमाणे सातवा वेतन आयोगानुसार पगार दिला जाणार आहे.

अर्जाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्वप्रथम या सर्व अर्जदारांची लेखी परिक्षा घेतली जाईल. लेखी परिक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. त्यानंतर मुलाखतीसाठी त्यांना बोलवण्यात येईल.

या पदांसाठी करू शकता अर्ज –
स्टेशन मॅनेजर, स्टेशन कंट्रोलर, सेक्शन इंजिनिअर, जूनिअर इंजिनियर, ट्रेन ऑपरेटर, ट्रॅफिक कंट्रोलर, सेफ्टी सुपरवायजर, टेक्नीशियनसह अन्य पदांसाठी भरती निघाली आहे.

First Published on September 11, 2019 12:22 pm

Web Title: mumbai metro recruitment 2019 nck 90
Next Stories
1 मागील बाजूला चार कॅमेरे ; Realme 5 Proचा खास सेल
2 बहुप्रतिक्षित iphone 11 सीरिज लाँच; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
3 Jio ला टक्कर, व्होडाफोनचा 59 रुपयांचा प्लॅन; दररोज 1GB डेटा
Just Now!
X