केस हे स्त्रियांच्या सौंदर्यातील अतिशय महत्त्वाचा घटक असतात. हे केस काळेभोर, घनदाट आणि मोठे असले की नकळत सौंदर्यात भर पडत असते. केसांचे हेच सौंदर्य राखण्यासाठी त्यांची योग्य ती काळजी घेणे गरजेचे आहे. पर्यावरण आणि आहारातील बदल यांचा थेट केसांच्या आरोग्यावर परिणाम होतो. त्यामुळे केस गळणे, त्यांची गुणवत्ता बिघडणे यांसारखे अपाय होतात. यावर वेगवेगळे शाम्पू किंवा कंडीशनर वापरणे, नाहीतर पार्लरमधील ट्रीटमेंट घेणे असे उपाय अवलंबले जातात. मात्र या उपायांमुळे केसांचे आरोग्य आणखी खराब होते. अशावेळी घरच्या घरी काही सोपे उपाय केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

खोबरेल तेलाचा मसाज

केस घनदाट होण्यासाठी खोबरेल तेलाचा मसाज हा उत्तम उपाय आहे. खराब झालेल्या केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी याचा चांगला फायदा होतो. खोबरेल तेलामुळे केस मऊ, सिल्की आणि मजबूत होण्यासाठी त्याचा फायदा होतो. याचा चांगला फायदा होण्यासाठी तेल थोडे कोमट करावे. मग हळूहळू त्याने केसांच्या मूळांना मसाज करावा. मग हे केस ३० मिनिटांसाठी शॉवर कॅपने बांधून ठेवावेत. मग शाम्पूचा वापर न करता धुवावेत.

तेलाने मसाज करणे आवश्यक 

केसाच्या मूळांना मसाज करणे केसांचे आरोग्य सुधारण्यास मदत होते. कमजोर असलेल्या केसांचे आरोग्य सुधारण्यासाठी याचा अतिशय चांगला उपयोग होतो. यामुळे तुमचे केस जाड आणि मजबूत होण्यास मदत होते.

अंडी आणि दूध

अंडी आणि दूध यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असते. केसांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी त्याचा चांगला उपयोग होतो. त्यामुळे आहारात अंडी आणि दूध यांचा समावेश असायला हवा.

होममेड हेअर टॉनिक

ओवा – बारीक केलेला २ चमचे
रोजमेरी – अर्धा कप बारीक केलेले रोजमेरी
पाणी – २ कप
हे सगळे पाण्यात २० ते २५ मिनिटे उकळून घ्या. हे मिश्रण गार होऊ द्या. चांगले परिणाम दिसण्यासाठी केस धुतल्या धुतल्या हे केसाला लावा.

ही काळजी जरुर घ्या

  • रासायनिक प्रक्रिया करणे टाळा
  • रोज शाम्पू लावणे टाळा
  • केसांचे स्ट्रेटनिंग करणे किंवा ते तापवून काही करणे टाळा