इन्स्टाग्रामने युजर्ससाठी नुकतेच एक नवीन फिचर आणले आहे. सध्या सर्वच वयोगटातील लोकांमध्ये या सोशल मीडिया अॅप्लिकेशनचा मोठ्या प्रमाणात वापर होताना दिसतो. त्यामुळे आपल्या युजर्सना जास्तीत जास्त सुविधा देण्याच्या दृष्टीने सोशल मीडिया पुढाकार घेताना दिसते. या नव्याने जाहीर करण्यात आलेल्या फिचरमध्ये युजर्सना आपली इन्स्टाग्रामवरील स्टोरी हाईड करण्याचा पर्याय उपलब्ध असेल. हे फिचर तुम्हाला तुमच्या अकाऊंटमध्ये अॅक्टिव्हिटी नावाने दिसेल. सध्या फेसबुक आणि व्हॉटसअॅपमध्ये सध्या ज्याप्रमाणे तुम्ही स्टोरी किंवा स्टेटस टाकल्यानंतर तुम्हाला ते काही जणांना दाखवायचे नसेल तर तुम्ही हाईडचा पर्याय निवडू शकता. इन्स्टाग्रामला ही सुविधा नव्हती. मात्र आता ती सुरु करण्यात आली आहे.

ज्या युजर्सना फॉलो करता किंवा ज्या युजर्संना मेसेज पाठवायचे आहे, त्यांचा अॅक्टिव्हिटीचा कालावधी तुम्ही अॅपवर पाहु शकता. मात्र तुमचे अॅक्टिव्हिटी स्टेटस इतरांना दिसू नये, असे तर यासाठीही एक उपाय आहे. यासाठी तुम्हाला तुमचे अॅक्टिव्हिटी स्टेटस बंद करावे लागेल. मात्र यामुळे तुम्ही इतरांचेही अॅक्टिव्हिटी स्टेटस पाहु शकणार नाही. आता ही स्टोरी हाईड करायची कशी ते पाहूयात…

१. आपल्या डिव्हाईसवर इन्स्टाग्राम अॅप ओपन करा. यावेळी तुमचे अकाऊंट लॉग इन असणे गरजेचे आहे.

२. प्रोफाईल आयकॉनवर टॅप करा. याठिकाणी वरच्या बाजूला तीन डॉट दिसतील. त्यावर क्लिक करा.

३. याठिकाणी सेटींग्जशी निगडीत असलेले अनेक पर्याय दिसतील. त्यात Show Activity Status अशा पर्यायावर क्लिक करा.

४. Show Activity Status बाय डिफॉल्ट ऑन असते. ते डिसेबल केल्यानंतर तुमचे अॅक्टिव्हिटी स्टेटस कोणालाही दिसणार नाही. त्यामुळे तुम्हाला तुमची इन्स्टाची स्टोरी कोणाला दाखवायची नसेल तर त्यासाठी हा एक उत्तम पर्याय असेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वीच इन्स्टाग्रामने आणखी एक नवीन फिचर लाँच करणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानुसार व्हॉट्सअॅपप्रमाणे आता इंस्टाग्रामवरही तुमचे लास्ट सीन दिसू शकणार होते. फिचर लाँच व्हायला वेळ असून त्याच्या डेव्हलपिंगचे काम सुरु असल्याचे कंपनीकडून सांगण्यात आले होते. याबरोबरच इन्स्टाच्या फोटोचा किंवा पोस्टचा स्क्रीनशॉट काढणाऱ्यांचेही आता रेकॉर्ड ठेवले जाणार आहे. त्यामुळे तुम्ही कोणाच्या फोटोंचे स्क्रीनशॉट घेत असाल तर ते तुमच्या अंगाशी येण्याची शक्यता आहे.