27 February 2021

News Flash

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा स्वस्त, Trai ने घटवले दर

एअरटेल, व्होडाफोन यांसारख्या देशातील इतर कंपन्यांची वर्षाला जवळपास 75 कोटी रुपयांची बचत होणार

Telecom Regulatory Authority of India (TRAI) ने मोबाइल नंबर पोर्टेबिलिटीची सुविधा स्वस्त केली आहे. यासाठीचे शुल्क कमी करुन ५ रुपये ७४ पैसे करण्यात आले आहे. यामुळे ग्राहकांना काही फायदा होणार नाही, मात्र टेलिकॉम ऑपरेटर्ससाठी हे दिलासादायक वृत्त आहे.

टेलिकॉम ऑपरेटर्सना प्रत्येक मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी ट्रांजेक्शनसाठी विविध एजेंसींना पैसे द्यावे लागतात. आता नव्या दरांमुळे टेलिकॉम ऑपरेटर्सची प्रत्येक ट्रांजेक्शनमागे होणाऱ्या खर्चात बचत होणार आहे. टेलिकॉम ऑपरेटर्सना प्रत्येक नव्या ग्राहकासाठी सध्या 19 रुपये खर्च येतो. हे पैसे Syniverse Technologies आणि MNP Interconnection Telecom Solutions यांसारख्या मोबाइल नंबर सर्व्हिस प्रोवायडर एजेंसींच्या खात्यात जातात. ‘इकॉनॉमिक टाइम्स’ने दिलेल्या वृत्तानुसार, ३० सप्टेंबरपासून नव्या दरांची अंमलबजावणी करण्यात येईल.

ट्रायने लागू केलेले नवे दर आधीच्या दरांपेक्षा 70% कमी आहेत. यामुळे टेलिकॉम कंपन्यांना फायदा होईल. नवीन दर लागू झाल्यानंतर एअरटेल, व्होडाफोन यांसारख्या देशातील इतर कंपन्यांची वर्षाला जवळपास 75 कोटी रुपयांची बचत होईल.

मोबाइल नंबर पोर्टेबिलिटी म्हणजे ग्राहकांना मोबाइल क्रमांक न बदलता, एका कंपनीची सेवा बदलून दुसऱ्या कंपनीची सेवा स्वीकारण्याची सुविधा. २००९ पासून ही सेवा ग्राहकांना पुरविण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 12, 2019 10:04 am

Web Title: new porting fee for mnp announced by trai will go effective on september 30 sas 89
Next Stories
1 क्रेडिट कार्डचं बिल भरण्यासाठी आईने चक्क विकली जुळी मुलं
2 रोहित शर्माची पत्नी आणि विराट गेले मुव्ही डेटला? जाणून घ्या सत्य काय
3 ‘किंमत युद्धा’मुळे आयफोनही स्वस्त!
Just Now!
X