८९९ रुपयांना मोबाईल…ऐकून विश्वास बसणार नाही पण हे खरे आहे. या किंमतीचा फोन आता उपलब्ध झाला आहे. रिलायन्स जिओचा जवळपास मोफत असलेला फोन बाजारात आला आणि मोबाईलच्या जगतात मोठी क्रांती झाली असे म्हणता येईल. दिवसागणिक अनेक आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय कंपन्या आपली नवनवीन मॉडेल्स बाजारात दाखल करत आहेत. एम-टेक (M-tech) इंफोर्मेटिक्‍स या कंपनीने नुकताच एक अतिशय स्वस्तातील फोन बाजारात आणला आहे. या फोनची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल. त्याची किंमत आहे केवळ ८९९ रुपये. ड्युअल कॅमेरा असलेला हा आतापर्यंतचा सर्वात स्वस्त स्मार्टफोन असल्याचे बोलले जात आहे.

विशेष म्हणजे किंमत कमी असली तरीही या मोबाईलची फिचर्स अतिशय आकर्षक आहेत. ड्युएल सिम असलेल्या या फोनची बॅटरी १ हजार मिलीअॅम्पिअर्सची आहे. त्याचा बॅटरी बॅकअपही चांगला आहे असे कंपनीचे म्हणणे आहे. याचा डिस्प्ले १.८ इंचाचा आहे. त्याचबरोबर वायरलेस एफएम रेडियो, ब्लूटूथ आणि ऑडिओ व्हिडीओ रिकार्डिंगची सुविधाही देण्यात आली आहे. G 24 असे नाव या फोनला देण्यात आले असून हा फोन इंग्रजी, हिंदी, कन्नड, तेलगू आणि बंगाली या भाषांमध्ये सपोर्ट करतो.

ई-कॉमर्स वेबसाईट्सवर ग्राहकांना या फोनची खरेदी करता येणार आहे. देखील विक्रीसाठी उपलब्ध असेल. इंटर्नल स्टोरेज १६ GB पर्यंत वाढवता येऊ शकते. याशिवाय या फोनमध्ये इतर स्मार्टफोनप्रमाणे यात एमपी3/एमपी4 प्‍लेयर, ऑटो कॉल रेकॉर्डर आणि टॉर्च यांसारख्या सुविधाही आहेत. यामध्ये काळा, लाल, निळा, ग्रे आणि ब्राऊन असे पाच रंग उपलब्ध आहेत. त्यामुळे अतिशय कमी किंमतीतील हा फोन म्हणजे ग्राहकांसाठी पर्वणीच आहे.