वारंवार आंतरराष्ट्रीय प्रवास करणे किंवा रात्रपाळीमध्ये काम करण्यामुळे शरीराचे झोपेचे चक्र बिघडत चालले असून, यामुळे आपल्या यकृताला हानी पोहोचू शकते, असा सल्ला एका नव्याने करण्यात आलेल्या पाहणीत करण्यात आला आहे.

स्वित्र्झलडच्या जिनिव्हा विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले. उंदिरावर करण्यात आलेल्या प्रयोगामध्ये टप्प्याटप्प्याने यकृताचा आकार जवळपास अध्र्यापेक्षा अधिक प्रमाणात आढळून आला.

Intermittent Fasting risks heart attack
सावधान! ‘या’ प्रकारचा उपवास केल्याने येऊ शकतो हृदयविकाराचा झटका? स्वतःची काळजी कशी घ्याल?
Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Can adding salt to drinking water help prevent dehydration this summer
उन्हाळ्यात पाण्यात चिमूटभर मीठ टाकून प्यावे का? डॉक्टर काय सांगतात वाचा….
5 Indian fruits that keep you hydrated during summer
शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी होईल मदत; उन्हाळ्यात करा ‘या’ ५ फळांचं सेवन

सामान्य जैविक क्रिया ज्या वेळी उलट होते, त्या वेळी ही अस्थिरता दिसून येते. आपल्या नैसर्गिक वेळेत व्यत्यय निर्माण झाल्यामुळे यकृतावर त्याचा परिणाम होत असल्याचे दिसून आले.

सस्तन प्राणी दैनंदिनीमध्ये दिवसभर काम आणि रात्री झोप घेणे याची सवय लावून घेतात. मेंदूतील पेशींना याची सवय लागते. यकृतामध्ये ३५० पेक्षा अधिक जीन्स चयापचय आणि निविषीकरण प्रक्रियेमध्ये सहभागी असतात. ही प्रक्रिया २४ तास सुरू असते, असे संशोधकांनी सांगितले.

याच्यातील अधिक जीन्स अन्न घेण्याची प्रक्रिया आणि शारीरिक क्रिया यामुळे प्रभावित होतात. यकृत यावर आपले कसे काम करते हे या अभ्यासात समजण्यास मदत झाली असे, असे मॉलीक्युलर बायोलॉजीचे प्राध्यापक उईली स्किब्लर यांनी म्हटले आहे. अभ्यासात उंदिराला रात्रीच्या वेळी खाद्य देण्यात आले तर दिवसभर त्याला देण्यात आली. यानंतर त्याचा यकृतावर काय परिणाम होतो, हे तपासण्यात आले. या वेळी यकृतामध्ये वाढ होत ती जवळपास ४० टक्क्यांपर्यंत जात असल्याचे यामध्ये दिसून आले.

हे संशोधन ‘सेल’ या नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आले आहे.