फिनलँडची कंपनी HMD Global ने नवीन बजेट स्मार्टफोन Nokia 2.3 लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा, मोठा डिस्प्ले असून दोन दिवसांचा बॅटरी बॅकअप मिळेल असा कंपनीचा दावा आहे.

नोकिया 2.3 फीचर्स –
‘अँड्रॉइड 9.0’ वर कार्यरत असणाऱ्या नोकिया 2.3 ला ‘अँड्रॉइड 10’ अपडेट लवकरच मिळणार आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा HD+ डिस्प्ले आहे. फोनमध्ये 2 जीबी रॅम आणि क्वॉड-कोर मीडियाटेक हीलियो A22 SoC प्रोसेसर असून ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात 13 मेगापिक्सल क्षमतेचा मुख्य कॅमेरा आणि 2 मेगापिक्सल डेप्थ सेंसर आहे. सेल्फीसाठी या फोनमध्ये 5 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेराही आहे. नोकिया 2.3 मध्ये 32 जीबी इंटरनल स्टोरेज आहे. याशिवाय 4,000mAh क्षमतेची दमदार बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे.

आणखी वाचा- आता आला Nokia चा ‘4K स्मार्ट टीव्ही’ , लाँचिंगलाच दिली डिस्काउंट ऑफर

नोकिया 2.3 किंमत –
कंपनीने नोकिया 2.3 ची किंमत 109 युरो (जवळपास 8600 रुपये) ठेवली आहे. भारतातही या फोनची किंमत ितकीच असेल असं सांगितलं जात आहे. चारकोल, सियान ग्रीन आणि सँड अशा तीन रंगांमध्ये हा फोन उपलब्ध असेल. अद्याप हा फोन भारतात लाँच करण्यात आलेला नाही, पण लवकरच हा फोन भारतात दाखल होणार आहे.