नोकियाचे स्मार्टफोन बनवणाऱ्या एचएमडी ग्लोबलने भारतीय बाजारात आपला नवीन स्मार्टफोन Nokia 2.4 लाँच केला आहे. Nokia 2.4 हा नोकिया 2 सीरिजमधील नवा स्मार्टफोन आहे. 3GB रॅम आणि 64GB स्टोरेज या एकाच व्हेरिअंटमध्ये हा फोन लाँच करण्यात आला आहे. फोनच्या कॅमेऱ्यासोबत नाइट मोड आणि पोट्रेट मोड मिळेल. तसेच या फोनच्या खरेदीवर टेलिकॉम कंपनी जिओकडून 3,550 रुपयांपर्यंतचे विविध बेनिफिट्स मिळतील, यात 2,000 रुपये कॅशबॅकचाही समावेश आहे.

Nokia 2.4 ची किंमत :-
Nokia 2.4 ची विक्री नोकियाच्या अधिकृत वेबसाइटवरुन आजपासून सुरू झाली आहे. 26 नोव्हेंबर ते 4 डिसेंबरपर्यंत कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवरुन ऑर्डर देणाऱ्या पहिल्या 100 ग्राहकांना जेम्स बॉन्ड 007 चं मर्चंडाइज हँम्पर दिलं जाईल. यात 007 स्पेशल एडिशन बॉटल, आणि मेटल की-चेनचा समावेश आहे. त्यानंतर चार डिसेंबरपासून हा फोन अॅमेझॉन इंडिया, फ्लिपकार्ट आणि अन्य रिटेल स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा फोन डस्क, एफजॉर्ड (Fjord) आणि चारकोल अशा तीन रंगांमध्ये खरेदी करता येईल. 10 हजार 399 रुपये इतकी फोनची किंमत ठेवण्यात आली आहे. या फोनची खासियत म्हणजे फोनमध्ये असलेली 4500mAh ची बॅटरी. ही बॅटरी दोन दिवसांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे.

Nokia 2.4 स्पेसिफिकेशन्स :-
Nokia 2.4 मध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनमध्ये MediaTek Helio P22 प्रोसेसर असून हा फोन अँड्रॉइड 10 वर कार्यरत असेल, तसेच नंतर Android 11 चा अपडेटही मिळू शकतो. फोनमध्ये गुगल असिस्टंटसाठी एक वेगळं बटण आहे. 3 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनचं स्टोरेज मेमरी कार्डद्वारे 512 जीबीपर्यंत वाढवता येणं शक्य आहे.

Nokia 2.4 कॅमेरा :-
Nokia 2.4 फोनमध्ये ड्युअल कॅमेरा सेटअप आहे. त्यातील मुख्य कॅमेरा 13 मेगापिक्सेलचा, तर दुसरा 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. रिअर कॅमेऱ्यासोबत फ्लॅश लाइटही आहे. तर, सेल्फीसाठीही 5 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. याशिवाय नोकियाच्या या फोनमध्ये 4500mAh ची बॅटरी असून बॅटरीला माइक्रो युएसबी पोर्टचा सपोर्ट मिळेल. ही बॅटरी दोन दिवसांचा बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 3.5एमएम हेडफोन जॅक, वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस आणि 4G VoLTE यांसारखे फिचर्स आहेत.