नोकियाचे फोन बनवणारी कंपनी एचएमडी ग्‍लोबलने नोकिया 6 ची नवी आवृत्ती नोकिया 6.1 (2018) लॉन्च केला आहे. एप्रिल महिन्यामध्ये कंपनीने ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह नोकिया 6 हा फोन लॉन्च केला होता. नोकिया 6.1 हे त्याच फोनचं अपग्रेडेड व्हर्जन आहे. या फोनमध्ये ४ जीबी रॅम आणि ६४ जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी देण्यात आली आहे. हा फोन अॅमेझॉन इंडिया या संकेतस्थळावर लिस्टींग करण्यात आला असून १३ मे पासून प्रत्यक्षात हे मॉडेल ग्राहकांना खरेदी करता येणार आहे. फोनची नेमकी किंमत किती असेल याबाबत संकेतस्थळावर माहिती देण्यात आलेली नाही, मात्र १८,९९९ रूपये इतकी या फोनची किंमत असू शकते.

एअरटेलने या फोनसाठी कॅशबॅक ऑफर आणली असून याच्या अंतर्गत ग्राहकांना २ हजार रूपयांचा कॅशबॅक मिळणार आहे. तर ‘मेक माय ट्रिप’ या अ‍ॅग्रीगेटरने देशांतर्गत हॉटेल्सच्या बुकींगसाठी २५ टक्के सवलत देऊ केली आहे. फोनमध्ये ५.५ इंच फुल एचडी क्षमतेचा आयपीएस डिस्प्ले (१९२० X १०८० पिक्सल्स ) देण्यात आला असून कॉर्नींग गोरीला ग्लासचे संरक्षक आवरण त्यावर आहे. याची रॅम ४ जीबी व ६४ जीबी स्टोरेज असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने १२८ जीबीपर्यंत वाढविण्याची सुविधा असेल. याशिवाय फोनमध्ये फिंगरप्रिंट स्कॅनरसह अ‍ॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील देण्यात आले आहेत.

स्पेसिफिकेशन –
प्रोसेसर – स्नॅपड्रॅगन ६३०
ऑपरेटिंग सिस्टीम – अॅन्ड्रॉइड ८.० (Oreo)
बॅटरी – ३००० एमएएच
कॅमेरा – १६ मेगापिक्सल रिअर कॅमेरा, ८ मेगापिक्सल फ्रंट कॅमेरा
कनेक्टिव्हिटी – 4G Volte , WiFi , bluetooth, GPS, Micro-USB port