मोबाईलच्या बाजारातील स्पर्धा दिवसेंदिवस वाढत असल्याचे दिसून येत आहे. दिवसागणिक कंपन्या आपले एकाहून एक उत्तम असे स्मार्टफोन बाजारात दाखल करत आहेत. फिचर फोनसाठी एकेकाळी प्रसिद्ध असणारी नोकीयाही यामध्ये मागे नाही. नुकताच कंपनीने आपला एक नवीन फोन दाखल केला असून त्याची फिचर्सही अतिशय आकर्षक आहेत. एचएमडी ग्लोबलने नोकियाचा हा नवा स्मार्टफोन भारतीय बाजारपेठेत दाखल केला. Nokia 7.1 असे या फोनचे नाव असून तो ऑनलाईन आणि ऑफलाईन ग्राहकांना खरेदी करता येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

हा स्मार्टफोन दोन महिन्यापूर्वी जागतिक बाजारपेठेत दाखल झाला. लंडनमध्ये तो सर्वात आधी लाँच करण्यात आला. त्यानंतर आता ७ डिसेंबरपासून तो भारतीय बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे. हा फोन ३ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेज आणि ४ जीबी आरएएम आणि ६४ जीबी बोर्ड स्टोरेज अशा दोन प्रकार उपलब्ध असणार आहे. नोकिया पहिल्यांदाच अॅड्राइड सिस्टीमवर उपलब्ध असणार आहे. Android One हा “प्युअरडिस्प्ले” स्क्रीन तंत्रज्ञानाचा हा पहिला स्मार्टफोन आहे. नोकिया 7.1 एचडीआर असल्याने व्हिडियो पाहताना मनोरंजनासाठी प्रेक्षकांना अनोखा अनुभव घेता येणार आहे. अन्य स्मार्टफोनमध्ये ही सुविधा नसल्याने या फोनचे हे विशेष आहे असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे. Nokia 7.1 च्या ४ जीबी / ६४ जीबी आवृत्तीची किंमत १९,९९९ रुपये असेल, असे कंपनीकडून सांगण्यात आलेय.

या स्मार्टफोनमध्ये १२ आणि ५ मेगापिक्सलचा असे ड्युअल कॅमेरे देण्यात आले आहेत. जेएईआयएसएस ऑप्टिक्ससह आणि ऑटोफोकस सक्षमतेचा आहे. प्रखर आणि कमी प्रकाशामध्ये या स्मार्टफोनमुळे डोळयांना त्रास होणार नाही असे कंपनीचे म्हणणे आहे. हे उपकरण क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६३६ चिपसेटद्वारे चालविले जाते. या स्मार्टफोनला ३०६० मिलीअॅम्पिअर्सची बॅटरी देण्यात आली आहे. तसेच याची यूएसबी टाइप-सी प्रकारची असल्याने फोन अतिशय कमी वेळात चार्ज होतो. अवघ्या ३० मिनिटांमध्ये फोन ५० टक्के चार्ज होतो असा दावाही कंपनीने केला आहे.