News Flash

तब्बल 15 हजारांनी स्वस्त झाला Nokia 9 PureView, ‘ही’ आहे नवी किंमत

एकूण 6 कॅमेरे असलेल्या या शानदार फोनच्या किंमतीत घसघशीत कपात

तब्बल 5 रिअर कॅमेरे असलेला Nokia 9 PureView हा स्मार्टफोन अखेर स्वस्त झाला आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत तब्बल 15 हजार रुपयांची कपात केली आहे. कंपनीच्या अधिकृत संकेतस्थळावर हा फोन नव्या किंमतीसह उपलब्ध करण्यात आला आहे.  नोकिया 9 प्युअर व्ह्यू या मॉडेलचे मोबाईल वर्ल्ड काँग्रेस 2019मध्ये अनावरण करण्यात आले होते. यात एकूण 6 कॅमेरे देण्यात आले आहेत. यातील फ्रंट कॅमेरा 20 मेगापिक्सलचा असून स्नॅपड्रॅगन 845 प्रोसेसर यात आहे.

या स्मार्टफोनच्या मागील बाजूला पाचही कॅमेरे हे प्रत्येकी 12 मेगापिक्सल्स क्षमतेचे आहेत. यातील तीन मोनोक्रोम तर दोन आरजीबी या प्रकारातील कॅमेरे आहेत. यातील तीन कॅमेरे हे उभ्या रांगेत तर दोन्ही बाजूला प्रत्येकी एक असे एकूण पाच कॅमेरे देण्यात आलेले आहेत. या सर्व कॅमेर्‍यांच्या मदतीने अतिशय दर्जेदार अशा प्रतिमा घेता येतात असं कंपनीचं म्हणणं आहे. एचडीआर, पोर्ट्रेट मोड आणि आर्टीफिशियल इंटिलेजंसच्या मदतीने यातून घेतलेली प्रतिमा ही तुलनेत अधिक सजीव वाटते असंही कंपनीने म्हटलंय. याशिवाय सेल्फी आणि व्हिडीओ कॉलींगसाठी 20 मेगापिक्सल्सचा कॅमेरा आहे. तसेच स्मार्टफोनमध्ये 5.9 इंचाचा क्वॉड HD+ POLED डिस्प्ले असून इन डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर हे फीचर देण्यात आलं आहे. 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या स्मार्टफोनमध्ये क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 845 हा प्रोसेसर दिलेला आहे. यात वायरलेस चार्जिंग सपोर्ट असून 3320 मिलीअँपिअर क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन गुगलच्या अँड्रॉइड वन या प्रोग्रॅमच्या अंतर्गत लाँच करण्यात आला असून हे मॉडेल अँड्रॉइडच्या पाय या अद्ययावत आवृत्तीवर चालणारे आहे.

किंमत :-
लाँचिंगवेळी या फोनची किंमत 49 हजार 999 रुपये इतकी होती. पण आता १५ हजार रुपयांची कपात करण्यात आल्याने हा फोन 34 हजार 999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 24, 2020 12:14 pm

Web Title: nokia 9 pureview price cut by rs 15000 know new price and all specifications sas 89
Next Stories
1 BSNL च्या ‘पॉप्युलर’ प्लॅनमध्ये 71 दिवस Extra व्हॅलिडिटी, दररोज मिळणार 3GB डेटाही
2 देशातला पहिला 5G स्मार्टफोन आज होणार लाँच, ‘इतकी’ असणार किंमत?
3 BS6 इंजिनसह आली नवीन Honda Shine , मायलेज वाढला; किंमत किती?