Nokia C3 हा स्मार्टफोन स्वस्त झाला आहे. नोकियाचे फोन बनवणाऱ्या HMD Global ने Nokia C3 च्या किंमतीत कपात केली आहे. कंपनीने या फोनच्या किंमतीत कपात केल्याने आता हा फोन सात हजार रुपयांपेक्षाही कमी किंमतीत खरेदी करता येईल. नवीन किंमत नोकियाच्या वेबसाइटवर अपडेट करण्यात आली आहे.

Nokia C3 स्पेसिफिकेशन्स :-
Nokia C3 हा एक एंट्री लेवल स्मार्टफोन आहे. यात 5.99 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे. यामध्ये Unisoc SC9863A ऑक्टाकोर प्रोसेसर आहे. फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा सिंगल रिअर कॅमेरा आणि सेल्फीसाठी 5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा आहे. या फोनमध्ये 3040mAh क्षमतेची बॅटरी असून 50 तासांचा टॉकटाइम बॅकअप देते असा कंपनीचा दावा आहे. या फोनच्या बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर आणि गुगल असिस्टंटसाठी वेगळं बटण आहे. तसेच यात 2 जीबी आणि 3 जीबी रॅमचा व 16 जीबी आणि 32 जीबी स्टोरेजचा पर्याय मिळेल. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये 4G LTE, वाय-फाय, ब्लूटूथ 4.2, जीपीएस, माइक्रो युएसबी आणि एफएम रेडिओ आहे.

नवीन किंमत :-
Nokia C3 हा फोन कंपनीने ऑगस्ट महिन्यात 2GB+16GB आणि 3GB+32GB अशा दोन व्हेरिअंटमध्ये लाँच केला होता. आता फोनच्या 2 जीबी रॅम व्हेरिअंटच्या किंमतीत 500 रुपयांची, तर 3 जीबी रॅम व्हेरिअंटच्या किंमतीत 1 हजार रुपयांची कपात करण्यात आली आहे. किंमतीतील कपातीनंतर हा फोन आता अनुक्रमे 6,999 रुपये आणि 7,999 रुपयांत खरेदी करता येईल.